भारतीय संघाने रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. भारताने एशिया कप (Asia Cup) 2022च्या त्यांच्या प्रवासाची सुरूवात चांगली केली आहे. या टी२० सामन्यात भारताचा हार्दिक पंड्या याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने भारताच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली. यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील मिळाला आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. जेथे चार वर्षापूर्वी हार्दिक गंभीर दुखापतग्रस्त झाला होता.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरवत गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत पाकिस्तानला 147 धावांवर सर्वबाद केले. यावेळी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने प्रथम गोलंदाजी नंतर फलंदाजीमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले आहे. त्याने विजयी षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. मात्र चार वर्षापूर्वी याच मैदानावरून हार्दिकला स्ट्रेचरवरून नेण्यात आले होते.
From @hardikpandya7's emotional Asia Cup journey to @imjadeja's solid batting display! ???? ????
The all-rounder duo chat up after #TeamIndia win their #AsiaCup2022 opener against Pakistan – by @ameyatilak
Full interview ???? ???? https://t.co/efJHpc4dBo #INDvPAK pic.twitter.com/MJOij6bDRl
— BCCI (@BCCI) August 29, 2022
चार वर्षापूर्वीच हार्दिकला गंभीर दुखापत झाली
एशिया कप 2018च्या हंगामात 19 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामना खेळला गेला. हा सामना वनडे प्रकारचा होता. त्यावेळी डावातील 18वा आणि हार्दिक त्याचे 5वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्यावेळी 5वा चेंडू टाकताना तो अचानक जमिनीवर कोसळला. त्याला हॅमस्ट्रिगंची दुखापत झाली होती. ही दुखापत एवढी गंभीर होती की त्याला उठताही येत नव्हते. यासाठी त्याला मैदानातून नेण्यासाठी स्ट्रेचर आणण्यात आले. स्ट्रेचरवरही तो डोळे मिटून पडला होता. त्या क्षणाला वाटले की हार्दिकची कारकिर्द संपली, मात्र त्याने पुनरागमन करत त्याच मैदानावर संघाला पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवून दिला आहे.
View this post on Instagram
त्या सामन्यात पाकिस्तानला 8 विकेट्सने केले होते पराभूत
मागील एशिया कपच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 43.1 षटकात 162 धावांवरच सर्वबाद केले होते. हे लक्ष्य भारताने 29 षटकातच पूर्ण करत सामना 8 विकेट्सने जिंकला होता. त्या सामन्यात हार्दिकने 4.5 षटकात 24 धावा दिल्या होत्या.
Waqt badal diya, jazbaat badal diye pic.twitter.com/XHKHeEU9Ch
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 28, 2022
हार्दिक-जडेजामुळे भारताचा विजय पक्का
हार्दिकने 4 षटके टाकताना 25 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच त्याने फलंदाजीत नाबाद 33 धावा केल्या. तर रविंद्र जडेजाने 35 धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जर 10 फिल्डरही बाउंड्रीवर असते, तरीही मी…’, हार्दिकने असा केलाय पाकिस्तानचा ‘करेक्ट कार्यक्रम’
नवरा भारताचा अन् पाकिस्तानची बायको, INDvsPAK सामन्यात झाली पंचाईत! फोटो तुफान व्हायरल
असे काय झाले की, हार्दिकने लाईव्ह सामन्यात पकडला रिझवानचा गळा! INDvsPAK मॅचमधील व्हिडिओ व्हायरल






