भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. मागील जवळपास सहा महिन्यांपासून उभय बोर्डांमध्ये आशिया चषक व वनडे विश्वचषक यांच्यातील सहभागामुळे रणकंदन सुरू आहे. आता या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी समोर येत असून, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आगामी आशिया चषकातून माघार घेऊ शकते.
नियोजित कार्यक्रमानुसार ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानात आशिया चषक खेळवला जाणार आहे. मात्र, बीसीसीआय व भारत सरकार आपला संघ त्या स्पर्धेसाठी पाकिस्तानात पाठवणार नाही. भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही तर, पाकिस्तान संघ विश्वचषकासाठी येणार नाही, अशी भूमिका पीसीबीने घेतली होती. मात्र, त्या मुद्द्यावर पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेत विश्वचषकासाठी येण्याचा शब्द आयसीसीला दिला आहे. परंतु, आता आशिया चषकावरून पुन्हा एकदा हा वाद पेटला.
भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानात येणार नसल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेल नुसार सामने खेळवण्याचा पर्याय सुचवला होता. यामध्ये पाकिस्तान आपले सर्व सामाने घरच्या मैदानावर तर भारतीय संघ आपले सामने दुबई येथे खेळणार असे सांगितले जात होते. मात्र, या प्रस्तावाला आता श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तान यांनी विरोध केला आहे. यामुळे पाकिस्तान संघाला फायदा होईल असे या संघाचे म्हणणे आहे.
आता नव्याने होत असलेला विरोध पाहून पाकिस्तान संघ थेट आशिया चषकातून माघार घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, यानंतर विश्वचषकातही सहभाग घ्यायचा की नाही या बद्दलही ते फेरविचार करतील. पाकिस्तान आशिया चषकात सहभागी न झाल्यास श्रीलंकेत अथवा भारतात ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते.
(Pakistan Might Pulled Out From Asia Cup After Srilanka Afganistan And Bangaladesh Oppose Hybrid Model)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वॉर्नरच्या ताकदीची द्रविडलाही जाणीव; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यापूर्वी म्हणाला, ‘त्याला आऊट करणे…’
भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा स्मिथ WTC फायनलपूर्वी चिंतेत; म्हणाला, ‘होय, मला टेन्शन…’