पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानची पहिली कसोटी शुक्रवारी (30 डिसेंबर) संपन्न झाली. कराची येथे झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांना अखेरच्या काही तासांमध्ये अत्यंत नाट्यमय खेळ पाहायला मिळाला. न्यूझीलंड संघाकडे विजयाची संधी असताना अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला. त्यामुळे न्यूझीलंडचे मालिकेत आघाडी घेण्याचे मनसुबे यशस्वी झाले नाहीत. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात नाबाद द्विशतक झळकावणारा केन विलियम्सन हा सामन्याचा मानकरी ठरला.
Players shake hands as bad light forces a draw in Karachi. #PAKvNZ | #WTC23 | ???? https://t.co/HdzZd87PUv pic.twitter.com/he76XGOulS
— ICC (@ICC) December 30, 2022
कराची येथील नॅशनल स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने शानदार खेळ दाखवला होता. कर्णधार बाबर आझमने 161 तर युवा सलमान आगा यानेही शतक साजरे केले. या धावांचा पाठलाग करताना आपल्या पहिल्या डावात न्यूझीलंडसाठी सलामीवीर डेवॉन कॉनवे व टॉम लॅथम यांनी 185 धावांची भागीदारी केली. कॉनवेने 92 तर लॅथमने शतक साजरे केले. केन विलियम्सनने जवळपास दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर झळकावलेल्या शतकाचे रूपांतर द्विशतकात करून न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मदत केली. ईश सोढीनेही कारकिर्दीत प्रथमच अर्धशतकी टप्पा पार केला. चौथ्या दिवशी अखेरच्या सत्रात न्यूझीलंडने आपला डाव 9 बाद 612 धावांवर घोषित केला. चौथ्या दिवसा अखेर पाकिस्तानने 2 बाद 72 अशी मजल मारली.
अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित होणार असे वाटत असतानाच पाकिस्तानने आपले आणखी दोन बळी शंभराच्या आत गमावले. सरफराज अहमद याने प्रतिकार करत शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर न्यूझीलंडने पाकिस्तानला लवकर बाद करण्याचे प्रयत्न केले. सौद शकील व मोहम्मद वसीम ज्युनिअर यांनी आठव्या गड्यासाठी 71 धावांची करत पाकिस्तानला सामन्यात आणले.
त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने धाडसी निर्णय घेत संघाचा डाव घोषित केला. त्यामुळे न्युझीलँडसमोर अखेरच्या एका तासात 15 षटकात 138 धावांचे आव्हान होते. त्यांनी आक्रमक फलंदाजी करत 7.3 षटकात 61 धावा बनवल्या. मात्र, त्यानंतर खराब प्रकाशामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 7.3 षटकांचा खेळ शिल्लक असतानाच सामना थांबवण्यात आला. मालिकेतील दुसरा सामना याच मैदानावर 2 जानेवारीपासून खेळला जाईल.
(Pakistan Newzealand Karachi Test Draw Dramatically)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतच्या अपघाताविषयी बीसीसीआयची मोठी अपडेट, बोर्ड कुटुंबियांच्या सतत संपर्कात
Rishabh Pant Car Accident: एका डुलकीने पंतची कारकिर्द धोक्यात! इतके दिवस राहणार क्रिकेटपासून दूर?






