Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Rishabh Pant Car Accident: एका डुलकीने पंतची कारकिर्द धोक्यात! इतके दिवस राहणार क्रिकेटपासून दूर?

Rishabh Pant Car Accident: एका डुलकीने पंतची कारकिर्द धोक्यात! इतके दिवस राहणार क्रिकेटपासून दूर?

December 30, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rishabh-Pant

Photo Courtesy: iplt20.com


शुक्रवारी (30 डिसेंबर) भारताचा स्फोटक विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत याचा कार अपघात झाला. त्याचा हा अपघात इतका भीषण होता की त्याच्या गाडीने थेट पेट घेतला आणि ती जळून खाक झाली. पंत काच तोडून बाहेर आला, तेव्हा तेथील उपस्थित लोकांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला ज्यामधून तो थोडक्यात बचावला आहे. त्याचे मेडिकल रिपोर्ट्स पुढे आले असून तो क्रिकेटपासून अधिक काळ दूर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रिषभ पंत (Rishabh Pant) भारताच्या कसोटी संघाचा आधारस्तंभ. हे त्याने मागील अनेक सामन्यांमधून सिद्ध करून दाखवले आहे. मात्र या अपघातामुळे तो क्रिकेटपासून अधिक महिने दूर राहू शकतो. तो त्याच्या आईला सरप्राईज देण्यासाठी एकटा निघाला होता. तेव्हा गाडी चालवताना झोपेची डुलकी आल्याने त्याचा अपघात झाला.

या अपघातादरम्यान पंतच्या गुडघ्याला जबरदस्त मार लागल्याचे समोर येत आहे. एखाद्या विकेटकीपरसाठी गुडघा महत्वाचा असतो. त्याच्या पायालादेखील फ्रॅक्चर झाले असून पाठ आणि डोक्याला मार लागला आहे. त्याच्या अपघाताचे व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यामध्ये त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दिसते. त्याचबरोबर त्याच्या पाठीवर प्लास्टिक सर्जरी करण्याची वेळ येऊ शकते. ज्यामुळे तो पुढील एक वर्ष तरी क्रिकेट खेळू शकणार नाही. यावरून तो 2023च्या वनडे विश्वचषकातून जवळपास बाहेरच झाला आहे.

#RishabhPant#rishabpantaccident
Blood bleading face 😞 pic.twitter.com/sXR3iuOYDR

— vk18_Rs45_forever (@virat18_rs45) December 30, 2022

बीसीसीआयने पंतच्या अपघाताबाबत अपडेट दिले आहे. त्याच्या कपाळावर दोन जखमा, उजवा गुडघा आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटात, घोट्याला, पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीलाही मोठी दुखापत झाली आहे.

Media Statement – Rishabh Pant

The BCCI will see to it that Rishabh receives the best possible medical care and gets all the support he needs to come out of this traumatic phase.

Details here 👇👇https://t.co/NFv6QbdwBD

— BCCI (@BCCI) December 30, 2022

पंत संघात नसेल तर भारताकडे विकेटकीपरसाठी केएल राहुल, इशान किशन, संजू सॅमसन, केएस भरत हे पर्याय आहेत. तर वनडेमध्ये किशन आणि कसोटीत भरत हे आघाडीवर आहेत.

पंतने नुकतेच बांगलादेश दौऱ्यातील दुसऱ्या कसोटीत 93 धावांची खेळी केली होती. हा सामना भारताने 3 विकेट्सने जिंकला होता. त्यातच भारत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. आता पंतची स्थिती पाहून तो महिन्याभरात ठीक होणार की नाही हे सांगणे कठीण आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: डिवायडरला धडकून हवेत उडाली कार! रिषभ पंतच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
‘तो’ दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते


Next Post
MS-Dhoni

आयपीएलच्या इतिहासात 'या' खेळाडूला मिळाली सर्वाधिक सॅलरी, धोनी दुसऱ्या स्थानावर

Rishabh Pant

पंतच्या अपघाताविषयी बीसीसीआयची मोठी अपडेट, बोर्ड कुटुंबियांच्या सतत संपर्कात

Pele vs Mohun Bagan

जेव्हा कोलकात्यात चालली पेलेची जादू, तेव्हा भारताच्या 'या' खेळाडूने अडवला होता गोल

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143