---Advertisement---

रिषभ पंतच्या अपघाताचे कारण आले समोर, डॉक्टरांनी प्रकृती स्थिर असल्याचा दिला रिपोर्ट

Rishabh Pant car accident
---Advertisement---

भारताचा स्टार विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत याचा शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटे मोठा कार अपघात झाला.  हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला ज्यामधून तो थोडक्यात बचावला आहे. यामध्ये त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर डेहराडूनच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कसा आणि कधी झाला हा प्रश्न सर्वांना पडला असेलच, तर त्याचे उत्तर मिळाले आहे.

रिषभ पंत (Rishabh Pant) तेव्हा गाडी चालवत होता. त्याने सिटबेल्ट लावले नव्हते, अशी माहिती समोर येत आहे. तेव्हा त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडीचा वेग इतका होता की ती थेट एका खांबला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. यादरम्यान त्याची गाडी डिवायडरला धडकली. त्यानंतर गाडीने पेट घेतला आणि तो विंड स्क्रीन तोडून बाहेर आला. इएसपीएन क्रिकइन्फोनुसार, त्याचा पहिला एक्स-रे समोर आला असून त्यामध्ये त्याला कोणतेही गंभीर फ्रॅक्चर नसून त्याच्या शरीरावरही भाजलेले डाग नाहीत. तो स्थिर असल्याचे दिल्ली क्रिकेटच्या सचिवांनी पीटीआयला माहिती दिली.

हा अपघात शुक्रवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटे या दरम्यान झाला. पंतची कार नारसन बॉर्डरवर रेलिंगला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला तेव्हा तेथिल उपस्थित लोकांनीही त्याची मदत केली आणि त्याला बाहेर काढले गेले. त्याला जर बाहेर काढले गेले नसते, तर मोठी जीवितहानी झाली असती. तो तेव्हा गाडीमध्ये एकटाच होता. तो आपल्या आईला सरप्राईज देण्यासाठी दिल्लीवरून रुरकीला जायला निघाला होता, अशी माहिती समोर येत आहे.

पंतला 3 जानेवारीपासून घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकांमधून विश्रांती दिली गेली. त्याने बांगलादेश दौऱ्यात कसोटी मालिकेत उल्लेखनीय खेळी केली होती. त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात 93 धावा करत भारताच्या विजयात मोलाची भुमिका पार पाडली होती.

भारत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत पंतचे असणे आवश्यक आहे, कारण त्याने ज्याप्रकारे कसोटी सामन्यांमध्ये खेळ केला त्यावरून तरी तो भारताच्या कसोटी संघाचा अविभाज्य भाग आहे. यामुळे त्याने लवकरात लवकर ठीक व्हावे अशी चाहत्यांची इच्छा आहे. ही कसोटी मालिका भारताने 3-1 किंवा 4-0 अशी जिंकली तर संघाच्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या अंतिम फेरीत पोहोचेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो’ दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते
दु:खद बातमी! फुटबॉल सम्राट पेलेंचे निधन, वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---