Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दु:खद बातमी! फुटबॉल सम्राट पेलेंचे निधन, वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दु:खद बातमी! फुटबॉल सम्राट पेलेंचे निधन, वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

December 30, 2022
in टॉप बातम्या, फुटबॉल
Pele

Photo Courtesy: Twitter/Pele


काही दिवसांपूर्वीच पुरूष फुटबॉल संघाचा 22वा विश्वचषक कतारमध्ये पार पडला. लोक आता नव्या वर्षाचे स्वागत करण्यास उत्सुक असताना धक्कादायक बातमी समोर आली. ब्राझीलचे स्टार आणि दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे गुरूवारी (29 डिसेंबर) निधन झाले. त्यांनी वयाच्या 82व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची गणना फुटबॉलच्या महान खेळाडूंमध्ये केली जाते. त्यांच्या मुलीने इंस्टाग्रामवरून हे वृत्त दिले आहे. पेले मागील काही काळापासून कॉलन कर्करोगाशी (Colon Cancer) झगडत होते. यासाठी ते हॉस्पिटलमध्येही भरती होते.

पेले (Pele) यांची मुलगी नॅसमेंटो आणि एजंट यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांच्या मुलीने इंस्टाग्रावर लिहिले, ‘आम्ही आज जे काही आहे हे तुमच्यामुळे. आमचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. रेस्ट इन पीस.’ पेले यांना 2021मध्ये ट्युमरचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर केमोथेरपी सुरू होती.

पेले यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन हॉस्पिटल, साओ पावलो येथे अखेरचा श्वास घेतला.

FIFA and all of the football world is mourning the death of O Eterno Rei – the eternal king.

Rest in peace, Pelé. Our thoughts and sympathies are with your family, friends and all who had the joy of watching you play.

— FIFA (@FIFAcom) December 29, 2022

काही दिवसांपूर्वीच पेले यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकारऊंटवरून लिओनल मेस्सी (Lionel Messi) आणि अर्जेंटिनाचे विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले होते. त्यावेळी त्यांनी अंतिम सामन्यात हॅट्ट्रीक करणाऱ्या कायलिन एमबाप्पे (Kylian Mbappé) याचेही कौतुक केले होते.

साओ पावलोच्या रस्त्यांवर फुटबॉल खेळणाऱ्या पेलेंनी ब्राझीलला नव्या शिखरावर पोहोचवले. वयाच्या 15व्या वर्षी सॅंटोस एफसीकडून फुटबॉल खेळण्यास सुरूवात केली आणि वयाच्या 16व्या वर्षी ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात प्रवेश केला. पुढे ते तीन फुटबॉल विश्वचषक जिंकले. अशी कामगिरी करणारे ते एकमेव खेळाडू आहेत.

पेलेंचे काही अनोखे रेकॉर्ड्स
पेले यांनी त्यांच्या कारकिर्दीत 1279 गोल केले. पेले यांनी 1958, 1962 आणि 1970मध्ये विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. त्याबरोबरच त्यांनी 6 ब्राझीलियन लीगचे विजेतेपदही पटकावले. दोन कोपा लिबर्टाडोरेस चषकही जिंकला. पेले यांनी ब्राझीलकडून 77 गोल केले.

🇧🇷 The one & only Pelé

⚽️ 1279 goals
🏆 3 FIFA World Cups
🏆 6 Brazilian league titles
🏆 2 Copa Libertadores
🎖️ FIFA Player of the Century
🎖️ TIME 100 Most Important People of the Century

🐐 The GOAT & Trailblazer #FIFAWorldCup|#Pele|#BRA pic.twitter.com/U13h7h5ssI

— FIFA World Cup Stats (@alimo_philip) December 29, 2022

पेलेंचे संपूर्ण नाव?
पेले यांचे पूर्ण नाव एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो, मात्र जग त्यांना ‘पेले’ या नावानेच ओळखते. त्यांचा जन्म 23 ऑक्टोबरला 1940मध्ये ब्राझीलच्या ट्रेस कोराकोएसमध्ये झाला. पेले यांनी तीन लग्न केले होती. त्यांना 7 अपत्ये आहेत. (Pelé died at the age of 82)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“रिषभने यष्टीरक्षणाकडे लक्ष द्यावे”, दिग्गज यष्टीरक्षकानेच दिला सल्ला
रझा होणार 2022 चा ‘सिकंदर’? संपूर्ण वर्ष गाजवत मिळवली दोन आयसीसी पुरस्कारांसाठी नामांकने


Next Post
Photo Courtesy: Twitter

रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; कार संपूर्ण जळाली, पंतचा पाय मोडल्याची भीती

Hyderabad FC

हैद्राबाद एफसीचा दणदणीत विजय; नॉर्थ ईस्ट युनायटेडला नमवत पुन्हा अव्वल नंबर

MS Dhoni

'तो' दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143