Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रिषभ पंतला आगीपासून धोका! थोडक्यात बचावण्याची पहिली नाही, तर दुसरी वेळ

रिषभ पंतला आगीपासून धोका! थोडक्यात बचावण्याची पहिली नाही, तर दुसरी वेळ

December 30, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter

Photo Courtesy: Twitter


भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटे भीषण अपघात झाला. अपघातानंतर पंतच्या डोक्याला, पाठिला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर पंतच्या गाडीने पेट घेतला असून गाडीची पूर्णपणे राख झाली. सुदैवाने पंत गाडीला आग लागण्यापूर्वीच त्यातून बाहेर पडला होता. ही पहिली वेळ नाहीये जेव्हा अशा प्रकारची आग पंतच्या अंगाशी आली आहे. यापूर्वी देखील असा प्रकार घडला आहे, जेव्हा आग पंतला महागात पडता, राहिली होता.

रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्या वडिलांचे एप्रिल 2017 मध्ये निधन झाले होते. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याच्या पडिलांचे निधन झाले असून, अंत्यविधी करताना पंतसोबत देखील एक मोठा अपघात होता-होता टळला.  पंतचे वडील राजेंद्र पंत यांनी वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वडीलांच्या अंत्यविधीसाठी पंत हरिद्वारमध्ये दाखल झाला. स्मशानभूमीत वडीलांना अग्नी दिल्यानंतर पंत आणि त्याचे चुलते ललित पंत त्याठिकाणी उभे होते. पण गंगा नदीच्या किनाऱ्यावर हवा जोराने येत होती. अशातच पार्थीव  देह जळत असताची आग पंत आणि त्याच्या चुलत्यांच्या अंगावर आली होती. या प्रसंगी पंतच्या पायाला भाजल्याचेही समोर आले होते. पाय भाजल्यानंतर पंत बराच वेळ गंगेच्या किनाऱ्यावर बसला होता.

Rishabh Pant
Photo Courtesy: Twitter

दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघाला तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. तसेच उभय संघांत तीन सामन्यांची वनडे मालिका देखील खेळली जाणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये निवडकर्त्यांनी पंतला विश्रांती दिली आहे. अशात आईला सरप्राईज देण्यासाठी पंत शुक्रवारी पहाटे दिल्लीहून रुरकीला निघाला होता. पण वाटेतच त्याचा अपघात झाला. माध्यमांतील वृत्तांनुसार पंतचा अपघात भीषण असला, तरी त्याची प्रकृती आता स्थिर आहे. पंतच्या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Medical update of Rishabh Pant says "He is stable". (Source – PTI)

— Johns. (@CricCrazyJohns) December 30, 2022

Rishabh Pant Broke Window To Escape Burning Car

He was lying injured, having survived that accident.

While helping him some youths came and ran after looting the money from his bag#RishabhPant pic.twitter.com/cNtbwzbgnV

— Ashwini Shrivastava (@AshwiniSahaya) December 30, 2022

भारतीय संघाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियन संघासोबत चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तसेच पुढच्या वर्षी भारतात आयसीसी वनेड विश्वचषकाचेही आयोजन केले जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने 3-1 किंवा 4-0 असा विजय मिळवला, तर संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचणार आहे. पंत भारतीय संघाचा महत्वाचा कसोटी खेळाडू असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी तो संघात पुनरागमन करेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. मात्र, त्याच्या अपघातात त्याच्या पाठिला झालेली दुखापत गंभीर असून त्याला दुखापतीतून पर्णपणे सावरण्यासाठी एक वर्षाचा काळ लागणार असल्याचेही सांगितले जात आहे. अशात वनडे विश्वचषकात पंत खेळणार की नाही, असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे. (-Rishabh Pant is in danger from fire! Not the first time, but the second time he escaped serious injury)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतच्या अपघाताचे कारण आले समोर, डॉक्टरांनी प्रकृती स्थिर असल्याचा दिला रिपोर्ट
‘तो’ दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते 


Next Post
Rishabh-Pant

Rishabh Pant Car Accident: एका डुलकीने पंतची कारकिर्द धोक्यात! इतके दिवस राहणार क्रिकेटपासून दूर?

MS-Dhoni

आयपीएलच्या इतिहासात 'या' खेळाडूला मिळाली सर्वाधिक सॅलरी, धोनी दुसऱ्या स्थानावर

Rishabh Pant

पंतच्या अपघाताविषयी बीसीसीआयची मोठी अपडेट, बोर्ड कुटुंबियांच्या सतत संपर्कात

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143