क्रिकेटविश्वातील सर्वाधिक प्रसिद्ध लीगपैकी एक इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल. या लीगमध्ये खेळण्यास प्रत्येक खेळाडू आतुर असतो. इंग्लंड कसोटी संघाचा माजी कर्णधार जो रुट यानेही त्याची आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा दर्शवली होती. त्याचे हे स्वप्न 2023मध्ये पूर्ण होणार आहे, कारण कोचीमध्ये झालेल्या लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने एक कोटी रुपयांना खरेदी केले. या लीगचा जसजसा लिलाव होत गेला तसतसे रकमेतही वाढ झाली. नुकत्याच 23 डिसेंबरला झालेल्या आयपीएल 2023च्या लिलावात सॅम करन लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले. यामुळे या लीगला पैसा लीगही म्हणता येईल. या लीगमध्ये सर्वाधिक सॅलरी कोणाला मिळते हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. चला तर मग त्याचे उत्तर जाणून घेऊ.
आयपीएलच्या 2023च्या हंगामापर्यंत सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये पाहिले तर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. मागील काही हंगामांपासून या लीगने जागतिक स्तरावर एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. बाकी लीगची तुलना केली तर आयपीएलमध्ये खेळाडूंवर पैशांचा अधिक पाऊस होतो. यामध्ये रोहित, धोनीबरोबर विराट कोहली यालाही मोठी रक्कम मिळते.
आयपीएलमध्ये सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या खेळाडूंची यादी समोर आली आहे. त्यामध्ये दहा खेळाडूंची नावे दिली गेली आहेत. आधी या यादीत धोनी अग्रेसर होता, मात्र ताज्या रिपोर्टनुसार रोहितने धोनीला मागे टाकत पहिला क्रमांक गाठला. त्याने आतापर्यंत 178.6 कोटी रुपये कमावले आहेत. रोहितने मुंबईला 5 आयपीएल विजेतेपद जिंकून दिले. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या हंगामात चषकावर नाव कोरले.
या यादीत धोनी 176.84 कोटी रुपयांसह दुसऱ्या आणि विराट कोहली 173.2 कोटी रकमेसह तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत सुरेश रैना, रविंद्र जडेजा, गौतम गंभीर, शिखर धवन आणि दिनेश कार्तिक या भारतीय खेळाडूंची नावेदेखील आहेत. विदेशी खेळाडूंमधील सुनील नरेन आणि एबी डिविलियर्स यांचा समावेश आहे. (highest ever IPL earner with IPL2023 salary Rohit Sharma in first place & MS Dhoni in 2nd)
आयपीएलच्या इतिहासात 2023च्या हंगामापर्यंत सर्वाधिक उत्पन्न मिळणारे पहिले 10 खेळाडू-
1) रोहित शर्मा – 178.6 कोटी
2) एमएस धोनी – 176.84 कोटी
3) विराट कोहली – 173.2 कोटी
4) सुरेश रैना – 110 कोटी
5) रविंद्र जडेजा – 109 कोटी
6) सुनील नारेन – 107.2 कोटी
7) एबी डीविलियर्स – 102.5 कोटी
8) गौतम गंभीर – 94.62 कोटी
9) शिखर धवन – 91.8 कोटी
10) दिनेश कार्तिक – 86.92 कोटी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Rishabh Pant Car Accident: एका डुलकीने पंतची कारकिर्द धोक्यात! इतके दिवस राहणार क्रिकेटपासून दूर?
रिषभ पंतला आगीपासून धोका! थोडक्यात बचावण्याची पहिली नाही, तर दुसरी वेळ