---Advertisement---

मोठी बातमी: भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला हादरा! प्रमुख गोलंदाजच झाला बाहेर; हा आहे पर्याय

On: शनिवार, सप्टेंबर 3, 2022 6:46 PM
dahani shahnawaz
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या आशिया चषक 2024 मधील सुपर‌ फोर फेरीला शनिवारी (3 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. त्यानंतर रविवारी भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. साखळी फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता. आता सुपर फोरमधील सामन्याआधी पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. संघाचा युवा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी हा साईड स्ट्रेन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत मीडिया हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली. साईड स्ट्रेनमुळे तो या सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही. सरावा दरम्यान त्याला हा त्रास जाणवू लागला होता. त्याचवेळी ही दुखापत गंभीर नसून, अफगाणिस्तान व श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी तो उपलब्ध असणार आहे असे देखील सांगितले गेले आहे.

https://twitter.com/TheRealPCBMedia/status/1566043611027972106?t=dCYPWXSvRwG1u3wTpgQIiQ&s=19

 

दहानी आधी संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी हा स्पर्धा सुरू होण्याआधीच दुखापतग्रस्त झाल्याने संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला होता. त्यानंतर आशिया चषकाच्या दोन दिवस आधी दुसरा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम याला देखील दुखापत झाल्याने तो देखील स्पर्धेत सहभागी झाला नाही. आता दहानी उपलब्ध नसल्याने त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज हसन अली याला संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तानच्या संघात युवा नसीम शहा, हारिस रऊफ व‌ हसन अली हेच तीन तंदुरुस्त वेगवान गोलंदाज आहेत. त्यांना शादाब खान व मोहम्मद नवाज हे फिरकीपटू साथ देतील.

साखळी फेरीत भारताकडून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानी हॉंगकॉंगला पराभूत करत सुपर फोर फेरी गाठली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या पठ्ठ्याने न्यूझीलंडविरुद्ध झळकावले शानदार शतक! 400 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमदार सुरुवात
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचे रवी चमकणार! प्लेइंग 11मध्ये होणार ‘हे’ बदल
विरुष्काचा फोटो वॉर्नरची कमेंट आणि ट्रोलिंग नंतरचं स्पष्टीकरण! वाचा काय आहे प्रकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---