वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WIvsIND) यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. तो ५ चेंडूत ११ धावा करत रिटायर्ड हर्ट होत तंबूत परतला. त्याला पाठीची दुखापत झाल्याने मैदान सोडावे लागले होते. त्याच्या या दुखापतीवर अनेक माजी खेळाडूंनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूचाही समावेश आहे.
पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याने म्हटले, “रोहितने त्याच्या फिटनेसला सर्वाधिक महत्व देणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याला दोन सामन्यातून विश्रांती दिली तर अधिक चांगले होईल. एशिया कपसाठी भारताला रोहितसारख्या खेळाडूंची गरज आहे.” (Rohit Sharma Injury)
रोहितला आरामाची आवश्यकता
रोहित वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात रिटायर्ड हर्ट होत मैदानाच्या बाहेर झाला होता. त्यानंतर त्याला बीसीसीआयच्या (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) मेडीकल स्टाफच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्याच्या दुखापतीबाबत कोणतेही मेडिकल रिपोर्ट्स समोर आलेले नाही. यामुळे तो उर्वरीत दोन सामन्यात खेळणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे.
रोहितला आरामाची आवश्यकता आहे, असा सल्ला देत दानिश म्हणाला, “रोहितला चौकार मारताना पाठीची दुखापत झाली. खेळाडूला दुखापत झाल्यावर किती त्रास होतो, याचा मला अंदाज आहे. सध्या त्याने त्याच्या फिटनेसला अधिक महत्व द्यायला हवे. त्यासाठी त्याला दोन सामन्यांना मुकावे लागले तरी चालणार आहे.”
“भारताला टी२० विश्वचषक आणि एशिया कपसाठी रोहितची आवश्यकता आहे. त्याला जर विश्रांती दिली तर श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रिषभ पंत हे कर्णधाराच्या पदासाठी पर्याय असणार आहेत,” असेही दानिश पुढे म्हणाला आहे.
मालिकेमध्ये भारताची आघाडी
भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतील तीन सामने खेळून झाले असून उर्वरीत दोन सामने अमेरिकेत खेळले जाणार आहेत. या मालिकेतील चौथा सामना ६ ऑगस्ट आणि पाचवा सामना ७ ऑगस्टला खेळला जाणार आहे.
या मालिकेनंतर भारत झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामध्ये भारत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. तर या महिन्याच्या शेवटी एशिया कप खेळला जाणार आहे. या स्पर्धेत सहा संघांचा समावेश असून भारताचे कर्णधारपद रोहितकडे असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भुवनेश्वर कुमार टी-२० वर्ल्डकप खेळणार की नाही? वाचा भारताच्या माजी दिग्गजाला काय वाटतं
शाकिब पुन्हा एकदा गोत्यात! आता केले थेट देशाविरोधी काम
भारतीय बॉक्सिंगची कॉमनवेल्थ गेम्समध्ये भन्नाट कामगिरी सुरूच, सात पदके झालीत पक्की