पाकिस्तान क्रिकेट संघात सध्या वातावरण बिघडलेले आहे. बाबर आझमची (Babar Azam) काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा वनडे आणि टी20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती, मात्र अलीकडेच त्याने संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेऊन पाकिस्तानला धक्का दिला. अशा परिस्थितीत कर्णधार म्हणून मोहम्मद रिझवानचे (Mohammed Rizwan) नाव पुढे आले आहे. रिझवानबद्दल बोलायचे झाले, तर तो अनेकदा मैदानात जखमी झाल्याचे नाटक करताना दिसतो. याबद्दल त्याने स्वत:ही सांगितले आहे.
मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan) विकेटकीपिंगला असो किंवा बॅटिंगला तो वेळोवेळी असे वागतो की, त्याला क्रॅम्प येतात. 2023च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान अशीच एक मजेदार घटना घडली. पाकिस्तान-श्रीलंका संघात सामना सुरू होता, ज्यामध्ये पाकिस्तानला विजयासाठी 345 धावांचे लक्ष्य होते. एकीकडे रिझवानने 131 धावांची नाबाद शतकी खेळी केली, तर अब्दुल्ला शफीकनेही 113 धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पण सामन्यादरम्यान एका प्रसंगी रिझवानने पुढे होऊन षटकार ठोकला, पण दुसऱ्याच क्षणी तो वेदनेने मैदानावर पडला.
शेवटच्या विश्वचषकादरम्यान पाकिस्तान-न्यूझीलंड संघात सामना सुरू होता. रचिन रवींद्रच्या (Rachin Ravindra) चेंडूवर रिझवानने स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हुकला. रिजवान अशा स्थितीत होता की त्याने क्रीजमध्ये राहण्यासाठी आपले दोन्ही पाय पसरले होते. सुरुवातीला तो व्यवस्थित दिसत होता, पण यष्टीरक्षकाने स्टंपिंगचे आवाहन करताच रिझवानने दुखापतीचे कारण पुढे केले. विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या घटनेनंतर रिझवानने स्वत: कबूल केले की, “कधी त्याची दुखापत खरी असते तर कधी तो नाटक करतो.”
मोहम्मद रिझवानच्या (Mohammed Rizwan) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने पाकिस्तानसाठी 32 कसोटी सामन्यात 44.41च्या सरासरीने फलंदाजी करताना 1,910 धावा ठोकल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 171 आहे. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 10 अर्धशतकांसह 3 शतके आहेत. 74 एकदिवसीय सामन्यात त्याने 2,088 धावा केल्या आहेत, तर 102 टी20 सामन्यात 126.45च्या स्ट्राईक रेटने 3,313 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर आझमनंतर पाकिस्तानचा पुढील कर्णधार कोण होणार? हा खेळाडू शर्यतीत सर्वात पुढे
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक द्विशतके झळकावणारे टाॅप-5 खेळाडू
सरफराज थांबायचं नाव घेईना! इराणी चषकात ठोकलं तुफानी द्विशतक