---Advertisement---

वाद पेटला! ‘मिस्टर बीन’ने वादाला दिली फोडणी, झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींना भिडले पाकिस्तानी पंतप्रधान

On: शुक्रवार, ऑक्टोबर 28, 2022 1:12 PM
Pakistan-vs-Zimbabwe
---Advertisement---

गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) पाकिस्तान संघाला टी20 विश्वचषक 2022मधील 24व्या सामन्यात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. झिम्बाब्वेने पाकिस्तानला अवघ्या 1 धावेने पराभूत केले. या सामन्यातील पराभवामुळे झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींनी पाकिस्तानला ट्विटरवरून ट्रोल केले होते. आता त्यांच्या ट्वीटचे प्रत्युत्तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्याकडे खरा ‘मिस्टर बीन’ नसू शकतो, पण त्यांच्याकडे खरी खिलाडूवृत्ती आहे.

पाकिस्तानी पंतप्रधानांचे ट्वीट
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी ट्वीट करत लिहिले की, “आमच्याकडे खरा मिस्टर बीन नसू शकतो, पण आमच्याकडे खरी खिलाडूवृत्ती आहे. आम्हा पाकिस्तान्यांना पुनरागमन करण्याची एक विचित्र सवय आहे. मिस्टर राष्ट्रपती शुभेच्छा. तुमच्या संघाने आज वास्तवात चांगला खेळ खेळला.”

झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींचे ट्वीट
खरं तर, झिम्बाब्वेचे राष्ट्रपती इमर्सन मनंगाग्वा (Emmerson Mnangagwa) यांनी पाकिस्तान संघाच्या पराभवानंतर आपल्या ट्वीटमध्ये ‘मिस्टर बीन’ (Mister Bean) यांना मेन्शन करत एक ट्वीट केले होते. त्यांनी लिहिले होते की, “झिम्बाब्वेसाठी काय विजय आहे! शेवरॉनला शुभेच्छा. पुढच्या वेळी खरा मिस्टर बीन पाठवा.”

काय आहे ‘मिस्टर बीन’ वाद?
पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे (Pakistan vs Zimbabwe) सामन्यापूर्वी ‘मिस्टर बीन’ वाद चर्चेत आला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 25 ऑक्टोबर रोजी संघाच्या सराव सत्राचे काही फोटो शेअर केले होते. त्यावर झिम्बाब्वेच्या एका चाहत्याने कमेंट केली होती. त्या चाहत्याने लिहिले होते की, “झिम्बाब्वेवासियांच्या रूपात आम्ही तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही एकदा आम्हाला मिस्टर बीन रोव्हनऐवजी फसवा पाक बीन दिला होता. आम्ही उद्या हे प्रकरण सोडवू, फक्त प्रार्थना करा की, पावसाने तुम्हाला वाचवावे.”

नगुगी चासुरा नावाच्या या चाहत्याचे हे ट्वीट सामन्यापूर्वी खूप व्हायरल झाले. तसेच, जेव्हा झिम्बाब्वेने हा सामना जिंकल्यावर त्यांच्या राष्ट्रपतींनीही हे त्यांच्या ट्वीटमध्ये मेन्शन केले. माध्यमांतील वृत्तांनुसार, 2016मध्ये पाकिस्तानने झिम्बाब्वेमध्ये प्रदर्शन करण्यासाठी एक खोटा मिस्टर बीन पाठवला होता, या खोट्या मिस्टर बीनने स्थानिक लोकांकडून त्यावेळी पैसेही घेतले होते.

आता हा वाद ट्विटरवर भलताच चर्चेत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नियमांना फाट्यावर मारत जिंकायला निघालेला पाकिस्तान, पण झिम्बाब्वेच्या सिकंदरने हाणून पाडला डाव
भारताच्या विस्फोटक फलंदाजाच्या यशामागील गुपीत काय? खुलासा करत म्हणाला, ‘आता मला कसली भीती’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---