टी२० विश्वचषकातील सर्वाधिक प्रतीक्षा केली गेलेला सामना भारत आणि पाकिस्तान या संघांदरम्यान खेळला गेला. दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारतावर १० गड्यांनी मोठा विजय मिळवला. यासह पाकिस्तानने विश्वचषकात भारताविरुद्ध कधीही विजय न मिळवण्याची साखळी खंडित केली. पाकिस्तानच्या या ऐतिहासिक विजयाचे सर्व क्षण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी दूरचित्रवाणीवरून पाहिले. पाकिस्तानच्या विजयानंतर या दोघांनीही ट्वीट करून आपल्या संघाचे कौतुक केले.
इम्रान खान यांचे ट्विट
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना इम्रान खान यांनी आपल्या दालनात सहकार्यांसह बसून पाहिला. पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर त्यांनी सामन्याचा आनंद लुटतानाचे ट्वीट केले. त्यांनी लिहिले, ‘सर्व पाकिस्तानी संघाचे अभिनंदन. बाबर आझम याने अत्यंत धैर्याने संघाचे नेतृत्व केले. रिझवान व शाहीन आफ्रिदी यांची कामगिरीही शानदार राहिली. संपूर्ण देशाला तुमच्यावर गर्व आहे.’
इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने १९९२ वनडे विश्वचषक जिंकला होता.
پاکستانی ٹیم خصوصاً بابر اعظم، جنہوں نے پوری جرات سے ٹیم کی قیادت کی اور رضوان اور شاہین آفریدی، جنہوں نے نہایت شاندار کارکردگی کا مظاہرہ کیا،کو دلی مبارکباد پیش کرتا ہوں۔ قوم کو آپ سب پر فخر ہے۔ pic.twitter.com/AfcrvI2JIC
— Imran Khan (@ImranKhanPTI) October 24, 2021
त्याचबरोबर पीसीबी अध्यक्ष व माजी कर्णधार रमीझ राजा यांनी देखील संघाचे कौतुक करताना ट्विट करत लिहिले, “हा पहिला विजय आहे. अनेक विजय अजून पुढे येणार आहेत. संपूर्ण पाकिस्तानसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आम्हाला आनंद साजरा करण्याचा क्षण दिला.
Alhamdolilla…It’s the first one, the most magnificent one but remember journey has just begun.. such a proud moment for all Pakistanis and thank you boys for providing us this moment to cherish.#PakistanZindabad
— Ramiz Raja (@iramizraja) October 24, 2021
पाकिस्तानने खंडित केली पराभवाची मालिका
भारत आणि पाकिस्तान हे संघ वनडे विश्वचषकात आत्तापर्यंत ७ वेळा आमने-सामने आले आहेत. या सर्व सामन्यात भारताला विजय मिळवला आहे. दुसरीकडे टी२० विश्वचषकात उभय संघ यापूर्वी पाच वेळा भिडले होते. या सर्व सामन्यात भारताने विजय मिळवला होता. मात्र आता या सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानने आपल्या विजयाचे खाते उघडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताला आफ्रिदी नडला! रोहित, राहुल अन् विराटच्या विकेट घेत दिले मोठे धक्के, पाहा व्हिडिओ
कोहलीचा ‘विराट’ कारनामा! आजपर्यंत कोणत्याच भारतीय कर्णधाराला न जमलेला विक्रम केला नावावर