श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेला पाकिस्तान संघ जबरदस्त प्रदर्शन करत आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना कोलंबोमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानने तब्बल 397 धावांची आघाडी घेतली. सलामीवीर अब्दुल्ला शफीक याने द्विशतक, तर मधल्या फळीतील आघा सुलमान यांने शतक ठोकले.
उभय संघांतील हा कसोटी सामना कोलंबोमध्ये सुरू आहे. तीन दिवसांच्या खेळानंतर दुसऱ्या डावाला अद्याप सुरुवात झाली नाहीये. श्रीलंकन संघाचा पहिला डावा अवघ्या 166 धावांवर गुंडाळला गेला होता. तर तिसऱ्या दिवसाखेर पाकिस्तान संघाची धावसंख्या 5 बाद 563 आहे. त्याच्याकडे अजून पाच विकेट्स बाकी आहेत. अशात पारडे स्पष्टपणे पाकिस्तानच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळते. पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) याने पहिल्याच डावात आपल्या संघाला चांगली सुरुवात देण्यासाठी 326 चेंडूत 201 धावांची अप्रतिम खेळी केली. तसेच मध्यक्रमातील आघा सलमान (Agha Salman) याने 148 चेंडूत नाबाद 132 धावा केल्या आहेत.
त्याव्यतिरिक्त सौद शकील (Saud Shakeel) याने 110 चेंडूत 57, तर शान मसूद (Shan Masood) याने 47 चेंडूत 51 धावा ठोकल्या. यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) हादेखील 61 चेंडूत 37* धावा करून खेळपट्टीवर कायम आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तान संघ पहिल्या सत्रात डाव घोषित करण्याची पूर्ण शक्यता आहे. पाकिस्तान संघाला एक डाव राखून सामना जिंकण्याचीही संधी असेल. पाकिस्तानच्या गोलंदाजी आक्रमाणातील अबरार अहमद (Abrar Ahmad) याने 20.4 षटकात 69 धावा खर्च करून चार विकेट्स घेतल्या. तसेच नसिम शाह याने 14 षटकात 41 धावा देत तीन विकेट्स नावावर केल्या. शाहीन शाह आफ्रिदी याला 11 षटकात 44 धावा खर्च केल्यानंतर एक विकेट मिळाली.
दरम्यान, उभय संघांतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने चार विकेट्स राखून विजय मिळवला होता. यजमान श्रीलंका संघासाठी या सामन्यातील सलग दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारणे निराशाजनक असेल. अशात संघ पराभव टाकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. (Pakistan scored 563 runs from 132 overs in the first innings Abdullah Shafique and Agha Salman’s tremendous innings)
महत्वाच्या बातम्या –
जेम्स अँडरसनबाबत धक्कादायक ब्रेकिंग! निवृत्तीविषयी स्पष्टच बोलला वेगवान गोलंदाज, म्हणाला…
ICC Ranking । रोहित टॉप 10मध्ये कायम, विराट आणि सिराजलाही फायदा