---Advertisement---

पाकिस्तानचा मीरपूर कसोटीत शानदार विजय; 5 विकेट्ससह नाहीद राणाची हटके कामगिरी

On: मंगळवार, मे 12, 2026 7:56 PM
---Advertisement---

पाचही दिवस सातत्याने चांगला खेळ करत बांगलादेशने मीरपूर कसोटीत पाकिस्तानला नमवण्याची किमया केली. दोन वर्षांपूर्वी बांगलादेशने पाकिस्तानला पाकिस्तानामध्ये हरवलं होतं. तशाच सातत्याने खेळ करत बांगलादेशने पाकिस्तानवर १०४ धावांनी दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार नझमुल हसन शंटोचं शतक आणि मोमिनुल हकच्या ९१ धावांच्या खेळीच्या बळावर बांगलादेशने ४१३ धावांची मजल मारली. शंटोने १२ चौकार आणि २ षटकारांसह १०१ धावा केल्या. मोमिनुलने १० चौकारांसह ९१ धावा केल्या. अनुभवी मुशफकीर रहीमने ७१ धावा करत या दोघांना चांगली साथ दिली. पाकिस्तानतर्फे मोहम्मद अब्बासने ५ विकेट्स पटकावल्या. शाहीन शहा आफ्रिदीने ३ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पदार्पणवीर अझान अवैसच्या शानदार शतकाच्या जोरावर पाकिस्तानने ३८६ धावा केल्या. अझानने १४ चौकारांसह १०३ धावांची खेळी साकारली. अब्दुल्ला फझल (६०), सलमान अघा (५८) आणि मोहम्मद रिझवान (५९) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. बांगलादेशतर्फे मेहदी हसन मिराझने ५ विकेट्स पटकावल्या. बांगलादेशने २७ धावांची अल्प आघाडी घेतली.

बांगलादेशने दुसऱ्या डावात २४० धावांवर डाव घोषित केला. कर्णधार शंटोने ७ चौकारांसह ८७ धावांची खेळी केली. मोमिनुल हकने ५६ धावा करत त्याला चांगली साथ दिली. चौथ्या दिवसाचा बराच वेळ पावसामुळे वाया गेला. त्यामुळे बांगलादेशने पाचव्या दिवशीही डाव सुरूच ठेवला. अडीच सत्र बाकी असताना बांगलादेशने पाकिस्तानला २६८ धावांचं लक्ष्य दिलं.

पाचव्या दिवशी आव्हानात्मक खेळपट्टीवर पाकिस्तानच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. अब्दुल्ला फझलने ६६ धावांची एकाकी झुंज दिली. कर्णधार शान मसूद २ करून तंबूत परतला. अनुभवी सलमान अघा आणि सौद शकील मोठी खेळी करू शकले नाहीत. बांगलादेशतर्फे वेगवान गोलंदाज नाहिद राणाने भेदक मारा करत ५ विकेट्स पटकावल्या. तास्किन अहमद आणि ताजिअुल इस्लाम यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत नाहिदला चांगली साथ दिली. पाकिस्तानचा दुसरा डाव ५२.५ षटकात १६३ धावांतच आटोपला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---