इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या वरिष्ठ पुरुष संघाला पहिल्या कसोटी सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना हेंडिग्ले येथे खेळला गेला, जो पाकिस्तानने एक डाव आणि 103 धावांनी गमावला. याबरोबरच त्यांच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये धावफलकावर एकही धाव न जोडता विकेट पडणे ही एक सामन्य बाब आहे, मात्र जेव्हा हे दोन्ही डावांमध्ये घडते, तेव्हा तिकडे सर्वांचे लक्ष वेधले जाते. पाकिस्तानसोबत नेमके हेच घडले आहे. पहिल्या डावात ऑली रॉबिन्सनने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर अझान अवैसला शून्यावर बाद केले. त्यांच्या दुसऱ्या डावात इमाम उल हक पाच चेंडू खेळत एकही धाव न काढता बाद झाला.
पाकिस्तानच्या दुसऱ्या डावातील पहिले षटक निर्धाव गेले, तर दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर इमामची विकेट गेली. तोपर्यंत पाकिस्तानने धावफलकावर एकही धाव जोडली नव्हती. त्यामुळे इमामच्या विकेटनंतर त्यांच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे.
पाकिस्तानने कसोटी सामन्यांच्या दोन्ही डावांमध्ये शून्य धावसंख्येवर आपली पहिली विकेट गमावण्याची ही सातवी वेळ आहे, जो एक विक्रम आहे. या यादीत इंग्लंड दुसऱ्या (5), ऑस्ट्रेलिया तिसऱ्या (4) आणि भारत चौथ्या (2) स्थानावर आहे.
यजमान इंग्लंड या मालिकेत जो रूटच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. बझबॉल युगानंतर इंग्लंडने तीन दिवसांतच सामना जिंकत एक चांगली आणि नवी सुरूवात केली आहे. यामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना गुरूवारपासून (27 ऑगस्ट) लॉर्ड्स येथे खेळला जाणार आहे.
सामन्याची स्थिती
या सामन्यात रूटने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉबिन्सन आणि जोश टंगमुळे पाकिस्तानचा पहिला डाव 171 धावसंख्येवर संपुष्टात आला. दोघांनी प्रत्येकी पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 409 धावांचा डोंगर उभारला. पाकिस्तानचा दुसरा डाव 37.3 षटकांत 135 धावसंख्येवर आटोपला. यामध्ये रॉबिन्सन, टंग आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. (Pakistan sets an unwanted record following a crushing defeat in Headingley Test against England; India and Australia also in list.)






