पाकिस्तानचा ऑफस्पिन गोलंदाज नौमान अलीला (Noman Ali) आयसीसीने (ICC) ऑक्टोबर महिन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून घोषित केले आहे. नोमान अलीने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत 20 विकेट्स घेत पाकिस्तानला 2-1 असा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या वर्षी ऑगस्टनंतर हा सन्मान मिळवणारा नोमान हा पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू ठरला आहे. बाबर आझम (Babar Azam) गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ ठरला होता.
नोमान अलीने (Noman Ali) दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरचा (Mitchell Santner) पराभव करून हा सन्मान मिळवला. रबाडाने ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशविरूद्धच्या 2 कसोटी सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या होत्या. दुसरीकडे, मिचेल सँटनरने भारताविरूद्ध 1 कसोटी सामना खेळला, ज्यामध्ये त्याने 13 विकेट्स घेण्यासोबतच 2 डावात 37 धावा केल्या होत्या.
नोमान अलीने (Noman Ali) इंग्लंडविरूद्धचे शेवटचे 2 कसोटी सामने खेळले, जिथे फिरकी गोलंदाजांना खूप मदत मिळाली. मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने एकूण 11 विकेट्स घेतल्या. दरम्यान त्याने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 8 विकेट्स घेतल्या. मालिकेतील तिसरा सामना रावलपिंडीत खेळला गेला. इथेही नोमानने धुमाकूळ घातला. यावेळी त्याने पहिल्या डावात 3 विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात त्याने 6 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
नोमान अलीच्या (Noman Ali) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने पाकिस्तानसाठी कसोटी फारमॅट खेळला आहे. कसोटीमध्ये त्याने 17 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 32 डावात गोलंदाजी करताना 27.65च्या सरासरीसह, 2.96च्या इकाॅनाॅमी रेटसह 67 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याने 6 वेळा विकेट्सचा पंजा लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ICC Ranking; आयसीसी क्रमवारीत भारतीय खेळाडूंची घसरण! टाॅप-20 मध्ये नाही एकही भारतीय
संघाला मोठा झटका! एकदिवसीय मालिकेपूर्वीच स्टार अष्टपैलू बाहेर
IPL 2025; ‘हे’ 3 खेळाडू केकेआरच्या कर्णधार पदासाठी ठरू शकतात दावेदार