टी-20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 international world cup 2026) च्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे (IND vs AUS).
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 23 जानेवारी रोजी या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या संघात स्टार फलंदाज बाबर आझम (Babar Azam & Shaheen Afridi) आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांचे पुनरागमन झाले आहे. हे दोन्ही खेळाडू गेल्या काही काळापासून पाकिस्तानच्या टी-20 संघापासून दूर होते. बाबर अलीकडेच ऑस्ट्रेलियातील ‘बिग बॅश लीग’मध्ये खेळताना दिसला होता. या मालिकेला 29 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
पहिला सामना: 29 जानेवारी
दुसरा सामना: 31 जानेवारी
तिसरा सामना: 1 फेब्रुवारी
हे तिन्ही सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. दोन्ही संघ या मालिकेच्या माध्यमातून आगामी विश्वचषकाची तयारी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतील.
या मालिकेसाठी अनुभवी यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान (Mohmmed Rijwan & Haris Rauf) आणि वेगवान गोलंदाज हारिस रौफ यांना संघात स्थान मिळालेले नाही. यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही या दोघांना डावलण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेचे नेतृत्व सलमान अली आगा याच्याकडे (Salman Ali Aaga) सोपवण्यात आले आहे. संघात फखर जमान आणि साहिबजादा फरहान यांचाही समावेश आहे, तर गोलंदाजीची धुरा नसीम शाह, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांच्या खांद्यावर असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा पूर्ण संघ:
सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नफे (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, साहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सईम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान (यष्टीरक्षक) आणि उस्मान तारिक.






