Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रमीझ राजा आणि पीएसएल संघमालकांत झाला वाद; ‘हे’ होते कारण

November 29, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/PSL

Photo Courtesy: Twitter/PSL


भारताता ज्याप्रकारे आयपीएलचे आयोजन केले जाते. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये आयपीएलचे अनुकरण करून पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल) सुरुवात झाली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा आणि पीएसएल संघ फ्रेंचायझींच्या मालकांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. पीएसएल स्पर्धेचा आगामी हंगाम अवघ्या काही महिन्यांवर आला आहे आणि अशातच हा वाद झाल्याचे चर्चेला उधाण आले आहे.

पाकिस्तानमधील एका माध्यमाने या घटनेची माहिती दिली आहे. पीएसएलच्या आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा आणि पीएसएल संघ फ्रेंचायझींच्या मालकांमध्ये बैठक झाली होती. याच बैठकीत राजा आणि फ्रेंचायझी मालकांमध्ये हा वाद झाल्याचे सांगितले गेले आहे. राजा यांच्यामते आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी फ्रेंचायझींनी खेळाडूंच्या वार्षिक वेतनामध्ये वाढ करायला हवी, असे म्हटले. पण, फ्रेंचायझींनी त्याला नकार दिल्याचे कळते.

बैठकीदरम्यान राजा यांनी असा प्रस्ताव मांडला की, फ्रेंचायझींनी खेळाडू खरेदी करण्यासाठी वापणारी जाणारी किंमत वाढवली पाहिजे. राजांच्या या प्रस्तावावर फ्रेंचायझींनी मात्र,आक्षेप व्यक्त केला. राजा असेही म्हणाले की, फ्रेंचायझींच्या अशा वर्तनामुळेच विदेशी खेळाडू अलिकडच्या काळात पीएसएलमध्ये भाग घेत नाहीत.

राजा पुढे म्हणाले, खेळाडू खरेदी करण्यासाठी वापरली जाणारी किंमत कमी असल्यामुळे विदेशी खेळाडू याठिकाणी येत नाहीत. याच्या प्रत्युत्तरात फ्रेंचायझी मालिकांनी देखील स्पष्ट भूमिका मांडली आहे. फ्रेंचायझी मालकांच्या म्हणण्यानुसार, अनेक विदेशी खेळाडूची पाकिस्तानमध्ये खेळण्याची इच्छाच नाहीय.

दरम्यान, पीएसएलमध्ये फ्रेंचायझींची खेळाडू खरेदी करण्यासाठी वापरली जाऊ शकणारी किंमत ०.९५ मिलियम डॉलर्स आहे. राजांच्या मते ही किंमत वाढवून १.२ डॉलर्स केली गेली पाहिजे. राजांनी या मागणीसाठी खूप आग्रह आणि वाद घातला असला तरी, फ्रेंचायझींनी मात्र त्यांची ही मागणी मान्य केली नाही.

दरम्यान, पाकिस्तान सुपर लीगमध्ये एकूण सहा फ्रेंचायझी संघ सहभाग घेतात. यामध्ये पेशावर, लाहोर, कराची, क्वेटा, इस्लामाबाद आणि मुल्तान या संघांचा समावेश आहे.


Next Post
india-test-team

काय लागणार कानपूर कसोटीचा निकाल? दिग्गजाने केले 'हे' भाकित

Photo Courtesy: Twitter/ Laxman Sivaramakrishnan

'मी आयुष्यभर रंगभेदाचा सामना केला'; एल शिवरामकृष्णन यांचा सनसनाटी आरोप

wriddhiman-saha

लढवय्या साहावर नेटकरी खूश! चाहत्यांच्या आल्या 'अशा' प्रतिक्रिया

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143