संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या एशिया कप 2018 स्पर्धेत उद्या (23 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सुपर फोरमधील सामना रंगणार आहे.
याआधी हे दोन संघ साखळी फेरीत आमने-सामने आले होते. यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे.
तसेच सुपर फोरमधील बांगलादेश विरुद्धचा पहिला सामनाही 7 विकेट्सने सहज जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.
पण त्याचबरोबर पाकिस्तान संघानेही सुपर फोरमधील त्यांचा आफगाणिस्तान विरुद्धचा रोमहर्षक झालेला पहिला सामना जिंकला होता. त्यामुळे पाकिस्तानही भारताविरुद्ध विजयाची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.
भारताविरुद्ध पाकिस्तानचे हे खेळाडू मिळवून देऊ शकतात विजय-
1. शोएब मलिक- पाकिस्तान संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असणारा शोएब मलिक भारतासाठी धोकादायक ठरु शकतो. त्याने एशिया कपमध्ये साखळी फेरीत भारताविरुद्ध 43 धावा केल्या होत्या. तसेच आफगाणिस्तानविरुद्धही नाबाद 51 धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता.
तसेच भारताविरुद्ध शोएबचा विक्रम कायमच चांगला राहिला आहे. त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत आत्तापर्यंत 9 शतके केली आहेत. त्यातील 4 शतके तर त्याने फक्त भारताविरुद्धच केली आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना त्याला रोखण्यासाठी उपाययोजना शोधाव्या लागणार आहे.
2. बाबर आझम- पाकिस्तानचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज बाबर आझमच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याने साखळी फेरीत भारताविरुद्ध पाकिस्तानकडून सर्वाधिक 47 धावा केल्या होत्या.
तसेच त्याने अफगाणिस्तान विरुद्धही 66 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. त्यामुळे आझम भारतीय संघासाठी वरचढ ठरु शकतो.
3. इमाम उल हक- पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज इमाम उल हक एशिया कपच्या साखळी फेरीत भारताविरुद्ध जरी 2 धावा करुन बाद झाला असला तरी त्याने अफगाणिस्तान विरुद्ध 80 धावा करत त्याने त्याचे इरादे स्पष्ट केले आहेत.
त्याने आत्तापर्यंत 12 वनडे सामन्यातच 4 शतके आणि 2 अर्धशतकांसह 676 धावा केल्या आहेत. त्याच्याबरोबरच त्याचा सलामीचा सहकारी फकार जामनही भारतासाठी डोकेदुखी ठरु शकतो. त्यामुळे या दोघांना लवकर बाद करण्याचे भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–अजिंक्य रहाणेचा वनडेत तडाखा, टीम इंडियाची दारे पुन्हा ठोठावली
–२० वर्षीय राशिद खानचा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा पराक्रम
–एशिया कप २०१८: भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक
–Video: धोनीच्या हुशारीने मिळवून दिली टीम इंडियाला ही महत्त्वाची विकेट