आशिया चषक 2022 मध्ये बुधवारचा (07 सप्टेंबर) दिवस अतिशय महत्वाचा आहे. कारण या दिवशी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान संघात सुपर-4 चा चौथा सामना रंगणार आहे. या सामन्यावर स्पर्धेची दशा आणि दिशा ठरेल. बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघ हा सामना जिंकत अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आपले सर्वोत्कृष्ट देईल.
या सामन्यात जर पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत केले, तर ते अंतिम सामन्यात पोहोचतील आणि भारत व अफगाणिस्तान आशिया चषकातून बाहेर हेतील. याउलट जर अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवले, तर भारताचे आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान टिकून राहील.
सामना: पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान
तारीख आणि वेळ: बुधवार 07 सप्टेंबर, ७.३० वाजता
स्थळ: शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स / डीडी स्पोर्ट्सवर भारतात लाईव्ह सामना पाहता येईल. डिझ्नी हॉटस्टारद्वारे मोबाईलवर लाइव्ह स्ट्रिमिंग होईल
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संपूर्ण संघ-
अफगानिस्तान संघ: मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह ज़दरान, अफसर ज़ज़ई, अज़मतुल्लाह ओमरज़ई, फरीद अहमद मलिक, फजलहक फारूकी, हशमतुल्ला शाहिदी, हज़रतुल्लाह जजई, इब्राहिम ज़दरान, करीम जनत, मुजीब उर रहमान, नजीबुल्लाह ज़दरान, नूर उल अहमद, रहमानुल्ला गुरबाज, राशिद खान, समीउल्लाह शिनवारी
स्टँडबाय: निजात मसूद, कैस अहमद, शराफुद्दीन अशरफ
पाकिस्तान संघ: मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हारिस रउफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, उस्मान कादिर, हैदर अली, हसन अली , शाहनवाज दहानी
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
अफगाणिस्तान संघ : हजरतुल्लाह जजई, रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जदरान, नजीबुल्लाह जदरान, करीम जनत, मोहम्मद नबी (कर्णधार), राशिद खान, अजमतुल्लाह ओमरजई, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी
पाकिस्तान संघ : मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, मोहम्मद नवाज, आसिफ अली, खुशदिल शाह, शादाब खान, नसीम शाह, हॅरिस रौफ, मोहम्मद हसनैन, इफ्तिखार अहमद
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारत आता अफगाणिस्तान भरोसे, नबी अन् संघाला पाकिस्तानविरुद्ध करावं लागेल ‘हे’ काम
कर्णधार रोहितच्या ‘या’ निर्णयामुळे हारली इंडिया! पाकिस्तानचा घाम फोडणाऱ्या गोलंदाजालाच केले बाहेर
रोहितच्या वादळी खेळीनंतर श्रीलंकेचा कमबॅक! टीम इंडिया 8 बाद 173