नेदरलँड्स आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची रविवारी (२१ ऑगस्ट) सांगता झाली. काहीशा कमी धावसंख्येच्या झालेल्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने यजमान संघाला विजयापासून वंचित ठेवत मालिका ३-० ने खिशात घातली. पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शहा सामनावीर तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मालिकावीर ठरला.
पहिले दोन सामने जिंकत आधीच मालिका जिंकलेल्या पाकिस्तानने या सामन्यातही विजयाच्या इराद्यानेच प्रवेश केला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांना तितकेच हे यश मिळाले नाही. एकटा कर्णधार बाबर आझम मैदानावर टिकू शकला. त्याने ९१ धावांची शानदार खेळी केली. यासह त्याने मालिकेत २२२ धावाही पूर्ण केल्या. त्याच्या याच खेळीच्या जोरावर पाकिस्तानने २०६ धावा उभारल्या.
समोर तितकीशी मोठी धावसंख्या नसल्याने नेदरलँड्सला विजयाची संधी होती. मात्र, त्यांना ही संधी साधता आली नाही. सलामीवीर विक्रमजीत सिंग याने अर्धशतक ठोकत एक बाजू लावून धरली. मात्र, मधल्या फळी तितकीशी साथ मिळाली नाही. अनुभवी टॉम कूपर याने देखील अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र, १०५ चेंडूतील ६२ धावांची त्याची संथ खेळी संपुष्टात आली आणि पाकिस्तानचा विजय निश्चित होऊ लागला. तळातील फलंदाज प्रतिकार न करू शकल्याने नेदरलँड्सला ९ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. याच मालिकेतून पदार्पण करणाऱ्या नसीम शाहने पाच बळी मिळवत पाकिस्तानच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘एशिया क्रिकेटचे माहेरघर, शारजाह क्रिकेट स्टेडियम’, टीम इंंडियाशी आहे खास कनेक्शन
तिसऱ्या वनडेत पुण्याचा ऋतुराज घेणार गब्बरची जागा!, वाचा काय आहे कारण
विराट-धोनी नाही, तर ‘या’ दोघांमुळे चहल आज भारताचा नंबर १ स्पिनर, स्वतःच दिले स्पष्टीकरण