पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमद आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेचा विषय ठरत असतो. एकदा तर अहमदने सर्व मर्यादा तोडल्या आणि भारताच्या अंतर्गत बाबींविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर भारतीय चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले होते.
सर्फराज अहमदचे वादग्रस्त विधान
अहमदने (Sarfraz Ahmed) मागील वर्षी काश्मीरमधून कलम ३७० (Article 370) हटविल्यानंतर केलेल्या विधानाने भारतीय चाहते त्याच्यावर नाराज झाले होते. त्याने बकरी ईदच्या निमित्ताने काश्मीरवर वादग्रस्त विधान केले होते. त्याने माध्यमांशी चर्चा करताना म्हटले होते, “अल्लाहने आर्टिकल ३७०च्या कठीण काळातून काश्मिरी बांधवांना मुक्त करावे. अहमद पुढे म्हणाला की काश्मिरींच्या दु: खामध्ये आम्ही सामील आहोत. संपूर्ण पाकिस्तानी समुदाय काश्मिरी बांधवांसोबत आहे.”
अहमदचे हे विधान भारतीय चाहत्यांना पटले नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काश्मीर मुद्द्यावर अहमदच नव्हे तर वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि शाहिद आफ्रिदीनेही वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांनाही जोरदार ट्रोल करण्यात आले होते.
वर्णद्वेषी वक्तव्य करत अडचणीत सापडला होता सर्फराज अहमद
अहमदने मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या अँडिले फेहलुक्वायोबद्दल (Andile Phehlukwayo) वर्णद्वेषी वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याच्यावर ४ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. अहमदवर अँटी- रॅसिझम कोड अंंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याने डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान फेहलुक्वायोबद्दल वर्णद्वेषी वक्तव्य केले होते.
त्याने डावाच्या ३७ व्या षटकादरम्यान फेहलुक्वायोला उर्दूमध्ये म्हटले होते, “अबे काले, तेरी अम्मा आज कहाँ बैठी है? आज क्या पढवा के आया है?” त्याचे हे वक्तव्य स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाले आणि त्यानंतर त्याच्यावर आणि पाकिस्तानवर टीका करण्यात आली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-श्रीलंकेच्या ‘या’ गोलंदाजाचा असा एक विक्रम जो मोडणे बुमराहच काय अन्य गोलंदाजासाठीही कठीण