यंदाच्या महिला आशिया कप (Women’s Asia Cup) स्पर्धेत पहिल्याच सामन्यात भारतानं पाकिस्तानला धूळ चारली होती. परंतू दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं नेपाळला धूळ चारत यंदाच्या आशिया कप स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. या विजयामुळे पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. पाकिस्ताननं नेपाळचा 9 विकेट्सनं दारुण पराभव केला.
तत्पूर्वी पाकिस्ताननं टाॅस जिंकून नेपाळला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ 6 गडी गमावून केवळ 108 धावाच करु शकला. त्यामध्ये कबिता जोशीनं (Kabita Joshi) 23 चेंडूत सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. तर सीता राणा मगर (Sita Rana Magar) 26, पुजा महातो (Puja Mahato) 25 आणि कबिता कन्वरच्या (Kabita Kunwar) 13 धावांच्या खेळीवर नेपाळनं पाकिस्तानसमोर 109 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानसाठी सादिया इक्बालनं (Sadia Iqbal) 2 विकेट्स घेतल्या. तर फातिमा सनानं (Fatima Sana) 1 विकेट घेतली.
नेपाळनं दिलेल्या 109 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानसाठी सलामीवीर गुल फिरोझा (Gull Feroza) आणि मुनीबा अली (Muneeba Ali) या दोघींनी चांगली भागीदारी केली. त्यांनी पहिल्या विकेट्ससाठी 103 धावा जोडल्या. फिरोझानं 35 चेंडूत 57 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्यामध्ये तिनं 10 चौकार लगावले. तर अलीनं 46 धावा करुन पाकिस्तानला सामना जिंकून दिला. नेपाळसाठी मात्र कबिता जोशी (Kabita Joshi) 1 विकेट घेण्यात यशस्वी राहिली.
या सामन्याचा सामनावीर पुरस्कार अर्धशतकी खेळी खेळलेल्या गुल फिरोझाला (Gull Feroza) देण्यात आला. पाकिस्ताननं 9 गडी राखून शानदार विजय मिळवला आहेच, पण त्यासोबतच यंदाच्या आशिया कपमध्ये सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा देखील जिवंत ठेवल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
हॉकी महाराष्ट्राची विजयी सुरुवात…
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाबद्दल आकाश चोप्रानं दिली प्रतिक्रिया
कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावून रुटनं केली ‘या’ दिग्गज खेळाडूंची बरोबरी