---Advertisement---

वेस्ट इंडिजसाठी पाऊस बनला खलनायक, पाकिस्तानने जिंकली टी२० मालिका

On: बुधवार, ऑगस्ट 4, 2021 7:22 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान संघात नुकतीच ४ सामन्यांची टी२० मालिका पार पडली. या मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी गयानाच्या प्रोविंडस स्टेडियममध्ये खेळला जाणार होता. मात्र, हा सामना पावसामुळे ३ षटकांनंतर रद्द करण्यात आला.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्टइंडीजने प्रथम फलंदाजी करत एकही विकेट न गमावता तीन षटकांमध्ये 30 धावा केल्या. सलामीवीर ख्रिस गेलने 6 चेंडूत नाबाद 12 धावा केल्या आणि आंद्रे फ्लेचरने 12 चेंडूत नाबाद 17 धावा केल्या. दोघे उत्तम फलंदाजी करत होते तेवढ्यात पावसाचे आगमन झाले. अखेर पावसामुळे सामना रद्द करावा लागला.

या टी-20 मालिकेत केवळ एक टी-20 सामना होऊ शकला. अन्य तिन्ही सामने पावसामुळे रद्द करावे लागले. या मालिकेत केवळ दुसऱ्या टी-20 सामन्याचा निकाल लागला. या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 157 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रतिउत्तरादाखल वेस्ट इंडिजला 20 षटकात 4 बाद 150 धावाच करता आल्या. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना 7 धावांनी जिंकला.

त्याचबरोबर मालिकेतील अन्य तिन्ही सामने रद्द झाल्याने पाकिस्तानने ही मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली.

चौथ्या टी-20 साठी असे होते संघ –

वेस्टइंडीज: अंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), कायरन पोलार्ड (कर्णधार), आंद्रे रसल, जेसन होल्डर, रोमालिओ शेफर्ड, ड्वेन ब्रावो, हेडन वॉल्स आणि आकील हुसेन.

पाकिस्तानी: मोहम्‍मद रिजवान (यष्टीरक्षक), शर्जील खान, बाबर आजम (कर्णधार), फखर जमान, मोहम्‍मद हफीज, शोएब मकसूद, शादाब खान, हसन अली, मोहम्‍मद वसीम, उस्‍मान कादिर आणि हैरिस राउफ.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---