कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये रविवारी (३१ जुलै) कट्टर प्रतिद्वंद्वी भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार आहेत. हा कॉमनवेल्थ गेम्समधील भारतीय महिला संघाचा दुसरा साखळी फेरी सामना असेल. बर्मिंघमच्या ऍजबस्टन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी दुपारी ३ वाजता नाणेफेक होणार होती. परंतु तत्पूर्वी बर्मिंघममध्ये पावसाचा खेळ सुरू झाल्याने नाणेफेकीस विलंब झाला.
अखेर पाऊस थांबल्याने ३.५५ ला नाणेफेक झाली असून पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आहे. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या डावात गोलंदाजी करताना दिसेल.
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २ प्रमुख बदल करण्यात आले आहेत. हरलीन देओल आणि राजेश्वरी गायकवाड यांना पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर करण्यात आले आहे. तर एस मेघना आणि स्नेह राणा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली आहे.
Two changes for this game in our Playing XI.
S Meghana and Sneh Rana – IN
Harleen Deol & Rajeshwari Gayakwad – OUTLive – https://t.co/6xtXSkd1O7 #INDvPAK #B2022 pic.twitter.com/Eulq2LJlIY
— BCCI Women (@BCCIWomen) July 31, 2022
असे आहेत दोन्ही संघ
पाकिस्तान: इराम जावेद, मुनीबा अली (यष्टीरक्षक), ओमामा सोहेल, बिस्माह मरूफ (कर्णधार), आलिया रियाझ, आयेशा नसीम, कैनात इम्तियाज, फातिमा सना, तुबा हसन, डायना बेग, अनम अमीन
भारत: स्म्रीती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिगेज, एस मेघना, दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग, रेणुका सिंग
दरम्यान टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघ ११ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताने ९ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला फक्त दोन विजय मिळाले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा ‘जादुई’ झेल, डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर पकडला चेंडू- Video
‘कोहलीमुळेच भारत टी२० विश्वचषक जिंकू शकत नाही’, पाकिस्तानी दिग्गजाने सोडले टीकास्त्र
मुलाच्या जन्मानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने केले लग्न, लव्हस्टोरी आहे खूपच जबरदस्त