---Advertisement---

मोठी बातमी! विश्वविजेते कर्णधार आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण; २ दिवसांपूर्वीच घेतली होती लस

On: शनिवार, मार्च 20, 2021 6:22 PM
---Advertisement---

इस्लामाबाद। पाकिस्तानचे विश्वविजेते कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. शनिवारी (२० मार्च) त्यांचे कोविड-१९ चे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याबद्दल पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयातून अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे इम्रान खान यांनी २ दिवसांपूर्वीच चीनमधील सिनोवॅक या लसीचा पहिला डोस घेतला होता. पण, यानंतर दोनच दिवसात त्यांचा कोरोना व्हायरस चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते घरातच आयसोलेशनमध्ये आहेत.

इम्रान खान हे पाकिस्तानचे विश्वविजेते कर्णधार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने १९९२ साली विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. पाकिस्तानचे महान अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इम्रान खान यांच्या कारकिर्दीतील हा अखेरचा विश्वचषक होता. त्यांनी पाकिस्तानला विश्वविजेतेपद मिळवून दिल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी ८८ कसोटी सामन्यात ३८०७ धावा आणि ३६२ विकेट्स तर वनडेत १७५ सामन्यात ३७०९ धावा आणि १८२ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी पाकिस्तानचे ४८ कसोटी आणि १३९ वनडे सामन्यात नेतृत्व केले आहे.

इम्रान खान यांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. २०१८ साली ते पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.

महत्त्वाच्या बातम्या –

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज : अंतिम सामन्याने चाहत्यांच्या २०११ विश्वचषक अंतिम सामन्याच्या आठवणी होणार ताज्या

 “बॅटची धार नेहमी तीक्ष्ण असावी…” निर्णायक ५ व्या टी२० सामन्यासाठी भारतीय फलंदाज सज्ज

अन् ‘त्या’ चिमणीला लॉर्ड्स संग्रहालयात मिळाली जागा, वाचा काय आहे कहाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---