भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या टी -२० मालिकेतील शनिवारी (२० मार्च) पाचवा आणि निर्णायक टी२० सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या सामन्यात दोन्हीही संघांना मालिका जिंकण्याची बरोबरीची संधी असणार आहे. दोन्ही ही संघ या मालिकेत २-२ ने बरोबरीत आहेत. या मोठ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज शिखर धवनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर चाहते आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात शिखर धवन याला भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात संधी देण्यात आली होती. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याने केएल राहुलसोबत सामन्याची सुरुवात केली होती. या सामन्यात त्याने अवघ्या ४ धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढील ३ सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. अशातच त्याने पाचव्या टी२० सामन्यापूर्वी सराव करत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे.
ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून लिहिले आहे की,”बॅटची धार नेहमी तीक्ष्ण असावी. ही केव्हा कामी येईल हे कोणाला माहित नाही.”
शिखरच्या या पोस्टनंतर काही चाहत्यांनी तो ५ व्या टी२० सामन्यात अंतिम ११ जणांच्या संघात खेळेल असा कयास लावला आहे.
https://www.instagram.com/p/CMmOewNjxwO/
भारतीय संघाने पहिल्या चार टी२० सामन्यांमध्ये प्रत्यकवेळी अंतिम ११ जणांच्या संघात बदल केले आहेत. पहिल्या टी२० सामन्यात शिखर आणि राहुलची जोडी मैदानात उतरली होती. तर पुढील सामन्यात धनवला विश्रांती देत इशान किशन आणि केएल राहुलला सलामीला संधी देण्यात आली होती. तसेच तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी मिळून सामन्याची सुरुवात केली होती.
अशातच चार सामन्यात अपयशी ठरलेल्या राहुलला या सामन्यात खेळण्याची संधी मिळेल का तसेच राहुल संघाबाहेर गेला तर विराट कोहली इशान किशन आणि शिखर धवन या दोन फलंदाजांपैकी कोणत्या फलंदाजाला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् ‘त्या’ चिमणीला लॉर्ड्स संग्रहालयात मिळाली जागा, वाचा काय आहे कहाणी
आयपीएल २०२१ पूर्वी भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंसाठी ‘ही’ आहे खुशखबर
INDvENG : निर्णायक ५ व्या टी२० सामन्यात रोहित, केएल राहुलसह ‘हे’ क्रिकेटपटू करु शकतात मोठे विक्रम






