पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात 5 वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (दि. 29 एप्रिल) रावळपिंडी स्टेडिअममध्ये पार पडला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिले षटक टाकल्यानंतर पंचांनी अचानक सामना रोखला. तिसरे पंच आणि ग्राऊंड्समन तातडीने मैदानात धावले. काही वेळासाठी प्रेक्षकांना समजलेच नाही की, नेमकं काय सुरू आहे.
न्यूझीलंडचे फलंदाज जेव्हा एक षटक खेळले. त्यानंतर पंचांना जाणवले की, 30 यार्डाचा सर्कल जेवढा असायला पाहिजे, त्यापेक्षा खूपच मोठा आहे. याचा अर्थ असा की, चुकीच्या सर्कलसह पहिले षटक टाकण्यात आले. आंतरराष्ट्रीय सामन्यात एवढी मोठी चूक समजताच सामना तातडीने रोखण्यात आला. तिसरे पंच मैदानावर आले आणि 30 यार्डाचे माप घेऊन मार्क करण्यात आले. पंच आलीम दार (Aleem Dar) हेदेखील पायांनी मोजमाप घेत सर्कल व्यवस्थित केला. यादरम्यान कर्णधार बाबर आझम याच्यासह पाकिस्तानचे खेळाडू पंचांच्या जवळच होते. त्यामुळे सामना जवळपास पूर्ण 6 मिनिटे रोखण्यात आला होता. यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली उडवण्यात आली.
Delete kr diya video but koi na main yha comment kr deta hu 👍 pic.twitter.com/99op3djjkV
— 𝙕𝙀𝙀𝙈𝙊™ (@Broken_ICTIAN) April 29, 2023
यापूर्वीही समोर आलंय अज्ञान
पाकिस्तानचे क्रिकेट नियमांबाबतचे अज्ञान यापूर्वीही समोर आले आहे. 2022च्या टी20 विश्वचषकादरम्यानही विराट कोहली (Virat Kohli) पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करत होता. यावेळी नो-बॉल यष्टींना लागून मागे निघून गेला. यावेळी विराटने धावत 3 धावा पूर्ण केल्या. यादरम्यान पाकिस्तानचे खेळाडू धावा रोखण्याऐवजी पंचांशी वाद घालू लागले. त्यावेळी पंचांनी स्पष्ट केले की, नो-बॉल किंवा फ्री हिटवर फलंदाज त्रिफळाचीत होऊनही धाव घेऊ शकतो.
इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेतही पाकिस्तान क्रिकेट संघाने नाचक्की करून घेतली होती. एका कसोटी सामन्यादरम्यान यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. तो सब्स्टिट्यूट म्हणून मैदानावर आला. बाबर आझम यामुळे मैदानातून बाहेर गेल्यानंतर रिझवान नेतृत्व करू लागला. यावेळी पंचांनी त्याला असे करण्यापासून रोखले. तसेच, सांगितले की, हे नियमांच्या बाहेर आहे. (pakistan wrongly marked 30 yard circle in second odi against new zealand umpires stop the match see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीने मोडलं KKRचं कंबरडं, IPL 2023मध्ये केली अनोखी ‘शंभरी’, सिराजनंतर बनला दुसराच गोलंदाज
‘सामन्यानंतर हॅरी ब्रूकला बदडताना काव्या मारन’, SRHचा महागडा खेळाडू फ्लॉप ठरताच ट्विटरवर मीम्सचा पाऊस