पाकिस्तान संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंड संघाला 7 विकेट्सने पराभूत केले. पाकिस्तान संघाच्या विजयानंतर संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू हेडन खूपच उत्साहित आहेत. त्यांनी सामन्यानंतर म्हटले की, त्यांना भारताविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे. यासोबतच त्यांनी असेही म्हटले की, अजून त्यांच्या संघाला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे.
काय म्हणाले मॅथ्यू हेडन?
पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) म्हणाले की, “आम्हाला भारतासोबत अंतिम सामना खेळायचा आहे. कारण, हा सामना मोठा असतो. आजचा दिवस खूप खास होता. आमच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. मला वाटत नाही की, आमचे आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रदर्शन समोर आले आहे. हे कदाचित त्या संघासाठी सर्वात भीतीदायक गोष्ट आहे, जो आमच्यासोबत अंतिम सामन्यात खेळेल.”
💬 "I'd say that's a complete performance and the world is going to see a lot more of that in four days' time!"
Matthew Hayden lauds the performance of the Pakistan team after their sensational win against New Zealand in the semis 👏
📽️ @TheRealPCB #T20WorldCup | #PAKvNZ pic.twitter.com/lskarDnbbh
— ICC (@ICC) November 9, 2022
ते पुढे बोलताना म्हणाले की, “मेलबर्नमध्ये फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी असू शकते.” दुसरीकडे, बाबर आणि रिझवान यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “तुम्ही कधीही दर्जाला पराभूत करू शकत नाहीत. या दोन्ही खेळाडूंनी ही गोष्ट इतक्या वर्षांपर्यंत सिद्ध केले आहे. मोहम्मद हॅरिसने नेट्समध्ये प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली आहे.”
उपांत्य सामन्याबद्दल बोलताना हेडन म्हणाले की, “गोलंदाजांना खेळपट्टीच्या अनुकूल गोलंदाजी करायची होती आणि त्यांनी असेच केले. पाकिस्तानी गोलंदाजांनी धिम्या चेंडूंचा उत्तम वापर केला. हॅरिस रौफ सातत्याने ताशी 150 किमीच्या वेगान गोलंदाजी करत आहे. जेव्हा पाकिस्तानचा दिवस असतो, तेव्हा त्यांना कुणीच रोखू शकत नाही. शादाब हा एक दमदार खेळाडू आहे. कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी तुम्हाला लढावं लागतं.”
भारताने अनेकदा केलाय पाकिस्तानचा पराभव
टी20 विश्वचषकात पाकिस्तान संघाने आतापर्यंत फक्त एकदाच भारताचा पराभव केला आहे. 2021च्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान संघाने भारताला 10 विकेट्सने पराभूत केले होते. याव्यतिरिक्त भारताने प्रत्येक वेळी पाकिस्तानचा पराभूत केले आहे. या विश्वचषकातही भारताने पाकिस्तानला चार विकेट्सने पराभूत केले होते. 2007मध्ये भारतीय संघाने दोन वेळा पाकिस्तानला पराभूत केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेमी-फायनलआधी कॅप्टन रोहितने फुंकले रणशिंग! म्हणाला…
हे नाही पाहिलं तर काय पाहिलं! पाकिस्तानच्या विजयानंतर आफ्रिदीचे सुटले नियंत्रण, केले ‘असे’ काही कृत्य