भारतात सध्या वनडे विश्वचषक खेळला जात आहे. या विश्वचषकासाठी विदेशातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (आयसीसी) करारबद्ध असलेले अनेक प्रेझेंटर भारतात दाखल झाले आहेत. यामध्ये पाकिस्तानची महिला प्रेझेंटर झैनब अब्बास हिचा देखील समावेश होता. मात्र, तिने आता भारत देश सोडला असून ती दुबईत दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Zainab Abbas has departed from India. (Samaa TV). pic.twitter.com/TyVr7tN1rP
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 9, 2023
पाकिस्तानची आघाडीची प्रेझेंटर झैनब अब्बास विश्वचषकात आयसीसीसाठी काम करत होती. मात्र, आता तिच्यावर भारतात पोलीस केस करण्यात आली असून त्यामुळे कारवाईच्या आधी तिने भारत देश सोडला असल्याचे बोलले जातेय. झैनबने भूतकाळात भारत देश आणि एका विशिष्ट धर्माविरोधात काही ट्विट केले होते. यामध्ये ती थेट भारताचा आणि सर्व धर्मीयांचा अपमान करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे तिच्यावर ही केस एका वकिलामार्फत दाखल केली गेली आहे. यामुळेच तिने भारत देश सोडल्याचे सांगितले जातेय.
पाकिस्तानातील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, झैनबने सुरक्षेच्या कारणास्तव भारत सोडला असून ती सध्या दुबईत आहे. या प्रकरणांनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहे.
(Pakistani Cricket Presenter Zainab Abbas Leaves India Due To FIR Against Him )
महत्वाच्या बातम्या –
आले किती गेले किती, पण वनडेतील ‘चेज मास्टर’ विराटच; सरासरी पाहून तोंडात घालाल बोटे
जिथं सचिन, तिथं विराट! वनडेत आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना ‘एवढ्या’ वेळा ठोकल्या 50 हून अधिक धावा