पाकिस्तान क्रिकेट ज्याप्रकारे आपल्या उत्कृष्ट खेळाडूंसाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे मॅच फिक्सिंग या क्रिकेटला काळीमा फासणाऱ्या गुन्ह्यासाठीही बदनाम असल्याचे दिसून येते. नुकतीच पाकिस्तानमध्ये मॅच फिक्सिंगची एक घटना घडली असून, यामध्ये दोषी आढळलेल्या आसिफ आफ्रिदी (Asif Afridi) याला दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या फिक्सिंगसाठी त्याच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही कारवाई केली. हे निलंबन 12 सप्टेंबर 2024 पर्यंत असेल.
Asif Afridi banned from all cricket for two years
Details here ⤵️ https://t.co/PLZRkLQVcu
— PCB Media (@TheRealPCBMedia) February 7, 2023
सध्या 36 वर्षांच्या असलेला आसिफ आफ्रिदी हा पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमधील एक अत्यंत अनुभवी खेळाडू मानला जातो. डावखुऱ्या हाताने फिरकी गोलंदाजी तसेच उपयुक्त फलंदाजी करण्यात त्याचा हातखंडा आहे. मागील वर्षी झालेल्या काश्मीर प्रीमियर लीगमध्ये त्याने ही मॅच फिक्सिंग केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर कारवाई म्हणून त्याला आता देशांतर्गत क्रिकेट तसेच पाकिस्तान सुपर लीगमध्ये देखील सहभागी होता येणार नाही. तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये मुलतान सुलतान संघाचे प्रतिनिधित्व करतो. तसेच, देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो खैबर पख्तूनवा संघाचा कर्णधार राहिला आहे.
त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा विचार केल्यास, त्याने 35 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये 118 बळी मिळवले आहेत. तसेच, त्याच्या नावे एक शतक देखील जमा आहे. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 42 सामन्यांमध्ये 59 बळी आपल्या नावे केले आहेत. तर, टी20 क्रिकेटचा विचार केल्यास 62 सामने खेळताना 63 बळी मिळवण्याची कामगिरी केली. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाने केलेल्या पाकिस्तान दौऱ्यावेळी त्याची पाकिस्तान संघात निवड झाली होती. मात्र, त्याला आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही.
(Pakistani Cricketer Asif Afridi Ban For Match Fixing In Kashmir Premier League)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कशी नशिबानं थट्टा आज मांडली! अनबॉक्सिंग करण्यापूर्वीच गमावला विराटचा नवा कोरा फोन, चाहत्यांकडे मागितली मदत
राहुलने पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनची माहिती केली लीक! ताबडतोब घ्या जाणून