शनिवारी (दि. 24 डिसेंबर) पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ बोहल्यावर चढला. त्याने वर्गमैत्रिणीसोबत लग्न केले. हॅरिस पत्नी मुजना मसूद ही पेशाने मॉडेल आहे. एकत्र शिक्षण घेताना हे दोघेही एकमेकांचे मित्र बनले होते. आता या दोघांनी त्यांच्या नात्याचे रूपांतर पती-पत्नीमध्ये केले आहे. मात्र, लग्नानंतर हॅरिसला सोशल मीडियावर संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याच्या पत्नीच्या नावाने सोशल मीडियावर अनेक बनावट अकाऊंट सुरू केले गेले आहेत. या अकाऊंटमार्फत लोकांना त्यांचे फॉलोव्हर्स वाढवायचे आहेत. अशात क्रिकेटपटूने स्वत: पुढे येत खरे काय ते सांगितले आहे.
हॅरिस रौफचे ट्वीट
हॅरिस रौफ (Haris Rauf) याने स्वत: त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. त्याने सांगितले आहे की, पत्नी मुजना मसूद (Muzna Masood) हिच्या नावाने बनवले गेलेले सर्व अकाऊंट हे बनावट आहेत.
त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, “सर्वांना नमस्कार, मला स्पष्ट करायचे आहे की, माझी पत्नी मुजना मसूद मलिक कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाहीये. तिचे कोणतेही अधिकृत अकाऊंट नाहीये. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहा. तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद.”
Hello everyone, I just want to make it clear that my wife, Muzna Masood Malik, is not on any social media platforms. She does not have an official account. Please be cautious of any scams. Thank you so much for all of your prayers and good wishes.
— Haris Rauf (@HarisRauf14) December 25, 2022
मुजनाने तिच्या लग्नावेळी हातावर हॅरिससाठी खास मेहंदी काढली होती. तिने हातावर हॅरिस 150 असे लिहिले होते. ही मेहंदी हॅरिसच्या गोलंदाजीची गती दाखवते. हॅरिस त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियात कमाल केल्यानंतर त्याने पाकिस्तान संघात एन्ट्री केली. त्याने टी20 आणि वनडेमध्ये पाकिस्तानसाठी धमाल केली आहे. मात्र, कसोटीत त्याला त्याच्या क्षमतेनुसार खास कामगिरी करता आली नाहीये.
mr and mrs haris rauf mashaAllah 🥺 pic.twitter.com/70zNzHkuEk
— hania (@haniaeyz_) December 24, 2022
हॅरिसच्या लग्नात संघसहकारी
हॅरिसच्या लग्नात पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि रौफचा संघसहकारी शाहीन आफ्रिदी यानेही हजेरी लावली होती. रौफ आता पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टी20 मालिकेत खेळताना दिसू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी संघात हॅरिसला संधी मिळाली नाहीये.
हॅरिसची कारकीर्द
हॅरिसच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने पाकिस्तानकडून 1 कसोटी, 15 वनडे आणि 57 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याला फक्त एक विकेट घेण्यात यश आले आहे. तसेच, वनडेत त्याने 5.8च्या इकॉनॉमी रेटने 29 विकेट्स आणि टी20त 8.07च्या इकॉनॉमी रेटने 72 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. (pakistani cricketer haris rauf clears his wife doesn t use social media accounts on her name are fake)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या 35 वर्षीय पठ्ठ्याचे 4 वर्षांनंतर पुनरागमन, मैदानावर उतरताच दाखवला दम; रिझवानची जागा धोक्यात
डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ‘हा’ खेळाडू महत्वाचा, भारतीय दिग्गजाचा दावा