न्यूझीलंडचा क्रिकेट संघ 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना नॅशनल स्टेडिअम, कराची येथे सोमवारपासून (26 डिसेंबर) खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा 35वर्षीय माजी कर्णधार सरफराज खान याचे पुनरागमन झाले आहे. त्याने शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2019मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. आता त्याच्या आगमनाने मोहम्मद रिझवान याचे स्थान धोक्यात आले आहे. कारण, सरफराजने पुनरागमन करताच आपल्या बॅटमधून आग ओकण्यास सुरुवात केली आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकत पाकिस्तान संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 5 विकेट्स गमावत 317 धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये कर्णधार बाबर आझम (Babar Azam) 161, तर आघा सलमान 3 धावांवर खेळत आहेत. एक वेळ अशी होती, जेव्हा पाकिस्तानने 48 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. या तीन विकेट्स अब्दुल्लाह शफीक, शान मसूद आणि इमाम उल हक यांच्या होत्या.
.@babarazam258 (161*) and @SarfarazA_54 (86) lead the way with outstanding knocks ????#PAKvNZ | #TayyariKiwiHai pic.twitter.com/JDqJWjzHg4
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 26, 2022
यानंतर बाबरने सौद शकील याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी रचली. शकील 22 धावांवर बाद झाला. यानंतर सहाव्या क्रमांकावर यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) मैदानावर उतरला. यावेळी त्याने शानदार फलंदाजी केली. तसेच, संघर्ष करत असलेल्या पाकिस्तान संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.
जवळपास 4 वर्षांपूर्वी म्हणजेच जानेवारी 2019मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या सरफराजने शानदार पुनरागमन केले. त्याच्या पुनरागमनाने खराब फॉर्मात असलेल्या मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याला संघातून बाहेर काढले आणि सरफराजला ताफ्यात सामील केले. यावेळी सरफराजने 153 चेंडूंचा सामना करताना 86 धावांची मोठी खेळी साकारली. तसेच, संघ व्यवस्थापन आणि टीकाकारांना चांगलेच प्रत्युत्तर दिले.
सरफराजने बाबरसोबत पाचव्या विकेटसाठी 196 धावांची मोठी भागीदारी रचली. अशात आता रिझवानच्या जागेला सरफराजकडून धोका निर्माण झाला आहे. सरफराजला 2020मध्ये मोहम्मद वसीम अब्बासी पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते बनल्यानंतर दुर्लक्षित केले गेले होते. कसोटीव्यतिरिक्त सरफराजने शेवटचा वनडे सामनाही एप्रिल 2021मध्ये खेळला होता, तर शेवटचा टी20 सामना नोव्हेंबर 2021मध्ये खेळला होता.
सरफराज 86 धावांवर खेळत असताना त्याला एजाज पटेल याने डॅरिल मिचेलच्या हातून झेलबाद केले. न्यूझीलंडकडून एजाज आणि मायकल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या. तसेच, कर्णधार टीम साऊदी यानेही एक विकेट घेतली. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेविषयी बोलायचं झालं, तर पाकिस्तान संंघ या स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अशात न्यूझीलंड संघाची पुढील वाट खडतर आहे. (pak vs nz 1st test 35 year old cricketer sarfaraz ahmed brilliant batting vs nz mohammad rizwan in danger)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ‘हा’ खेळाडू महत्वाचा, भारतीय दिग्गजाचा दावा
हा अनुभव प्रत्येकाला मिळो! मुलींसोबत राष्ट्रगीत गातानाचा क्षण अभिमानास्पद, वॉर्नरने शेअर केला फोटो