पाकिस्तानला इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. कराची येथे खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने ही मालिका 3-0ने जिंकली. 2005नंतर पहिल्यांदा पाकिस्तानात कसोटी दौरा करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने आक्रमक क्रिकेटचे प्रदर्शन केले. त्यांच्या फलंदाजांनी पाकिस्तानी मैदानावर आपल्या बॅझबॉलच्या शैलीत इतिहास रचला. मात्र, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला त्याच्याच देशात टीकांचा सामना करावा लागत आहे.
माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल (Kamaran Akmal) याने देखील बाबर आझम याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. कामरान अकमल, उमर अकमल (Umar Akmal ) हे दोघे बाबर आझम (Babar Azam) याचे कझन आहेत. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाच्या हातून कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव देखील पाकिस्तानला त्यांच्याच मैदानावर मिळाला. त्यानंतर टी20 विश्वचषकाआधी इंग्लंडने पाकिस्तान विरुद्ध 7 टी20 सामन्यांची मालिका खेळवली गेली होती. यात देखील पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर इंग्लंडने पाकिस्तानचा टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव केला आणि आता त्यांना ही कसोटी मालिका देखील गमवावी लागली.
कामरान अकमल याने आपल्या यू-ट्यूब चॅनलवर बाबरच्या नेतृत्वावर चर्चा करताना तो म्हणाला की, ” जेव्हा कोणताही संघ पाकिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका जिंकतो तेव्हा ही मोठी गोष्ट असते. इंग्लंड संघासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. ते इतक्या वर्षांनी पाकिस्तानात खेळायला आले आणि इतिहास घडवून गेले. त्यांनी आपल्याला उपदेश दिला आहे की आम्ही तुमच्या क्रिकेट, तुमची मानसिकता आणि तुमच्या सिस्टिमच पितळ उघडं पाडलं.आता तुम्हाला निर्णय घ्यायचा की तुम्ही तुमचा खेळ कसा सुधरवता.”
इंग्लंडचा कसोटी संघ 17 वर्षांनी पाकिस्तानात कसोटी मालिका खेळण्यासाठी आला होता. यात त्यांनी पाकिस्तानचा दारुण पराभव करत ही मालिका जिंकली. पाकिस्तानात पाकिस्तानला कसोटी मालिकेत हरवणारा इंग्लंड पहिला संघ ठरला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ दोघांवर मुंबई इंडियन्स नक्कीच बोली लावेल, भारतीय दिग्गजाचा दावा
चार हजार कोटींचा मालक असणारा मेस्सी दिवसाकाठी कमावतो ‘एवढा’ पैसा, आकडा वाचून येईल आकडी