Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चार हजार कोटींचा मालक असणारा मेस्सी दिवसाकाठी कमावतो ‘एवढा’ पैसा, आकडा वाचून येईल आकडी

चार हजार कोटींचा मालक असणारा मेस्सी दिवसाकाठी कमावतो 'एवढा' पैसा, आकडा वाचून येईल आकडी

December 21, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
lionel messi luxury

Photo Courtesy: Twitter/Teammessi


फीफा विश्वचषक 2022 ही स्पर्धा नुकतीच कतारमध्ये पार पडली. अंतिम सामन्यात लिओनल मेस्सी याची जादू बघायला मिळाली. लिओनल मेस्सी याने अर्जेंटिना संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या संघाने फ्रान्सला पेनाल्टी शूटआऊटमध्ये 4-2ने पराभूत केले. अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षांनी हा विश्वचषक जिंकला आहे.

अर्जेंटिनाने 2014मध्ये देखील अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. मात्र, संघाला अंतिम सामन्यात जर्मनीच्या हातून पराभव स्वीकारावा लागला होता. प्रतिस्पर्धी संघाने 1-0ने अर्जेंटिनाचा पराभव करत विश्वचषक जिंकला होता. यामुळे 2014मध्ये मेस्सीचे जगज्जेता बनण्याचे स्वप्न भंग पावले होते. त्या सामन्यात जर्मनीचा स्टार फुटबॉलपटू मारियो गोट्जे (Mario Gotje) याने 113व्या मिनीटाला गोल केला होता.

अर्जेंटिना प्रमाणेच भारतामध्ये देखील मेस्सीचा चाहतावर्ग अफाट प्रमाणात आहे. जर फुटबॉलपटू जगविख्यात असेल तर त्याच्या जीवनातील प्रत्येक बाजू जानून घेण्यात लोकांना रस असतो. लिओनल मेस्सी खूप अलिशान आयुष्य जगतो. मेस्सीकडे सर्वोत्तम गाड्यांबरोबरच अलिशान घर, हॉटेल आणि एक प्रायवेट जेट देखील आहे. जर त्याच्या संपत्ती आणि मिळकतीबद्दल बोलायचे झाले तर ती खालील प्रमाणे

मेस्सीची एकूण संपत्ती
मेस्सीची एकूण संपत्ती 600 मिलीयन डॉलर म्हणजेच 4952 कोटी रुपयेे इतका आहे. अहवालानुसार तो प्रत्येक दिवशी 1,05,000 डॉलर कमवतो. मेस्सी नेहमी पार्टी आणि त्याच्या झगमगाटापासून लांब राहणे पसंत करतो. याचा अर्थ असा नाही की तो अलिशान आयुष्य जगत नाही. अर्जेंटिनाच्या नो फ्लाय झोनमध्ये त्याचा अलिशान बंगला आहे.

कमाईच्या बाबतीत मेस्सी अव्वल
अहवालानुसार 2021-2022मध्ये मेस्सी सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू होता. मेे 2021 ते मे 2022 यादरम्यान त्याची संपत्ती जवळपास 130 मिलीयन डॉलर झाली.

2017मध्ये एंटोनेला रोकुझो हीच्याशी विवाह केला
लिओनल मेस्सी (Lionel Messi) आणि एंटोनेला रोकुजो (Entonela Roccuzzo) लहाणपणापासून एकमेकांना ओळखत होते. जेव्हा ते 5 वर्षांचे होते, तेव्हा त्यांची ओळख झालेली आणि 2017मध्ये ते विवाहबद्ध झाली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जोफ्राने चेंडू चोरणाऱ्या महिलेला खडसावले; म्हणाला ‘तु त्या चेंडूने फ्लॅट विकत घे…’
भारताला धक्का! राहुलला प्रॅक्टिसवेळी मोठी दुखापत, संघाबाहेर पडताच ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व


Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

'या' दोघांवर मुंबई इंडियन्स नक्कीच बोली लावेल, भारतीय दिग्गजाचा दावा

football

लॉयला, विद्या व्हॅली, विद्याभवन उपांत्य फेरी

Babar Azam kamran Akmal

बाबर आझमच्या भावानेच केली त्याची कानउघडणी; म्हणाला, 'इंग्लंडने तुमचं पितळं उघडं...'

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143