पाकिस्तान क्रिकेट संघ नेहमीच क्रिकेटच्या मैदानात छोट्या-छोट्या चुका करताना दिसला आहे. त्यांच्या या चुका नेहमीच चर्चेचा विषय ठरत असताना. मग ते खेळाडूंची एकमेकांशी धडक होऊन झेल सोडणे असो किंवा दुसरा कुठला मजेशीर प्रसंग. आता पुन्हा एकदा त्यांच्या खेळाडूने असाच काहीसा मजेशीर प्रकार केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल देखील होत आहे. नेटकरी रोहेल नजीर या पाकिस्तान खेळाडूला या व्हिडिओमुळे चांगलेच ट्रोल करत आहेत.
क्रिकेटच्या मैदानात फ्री हिट मिळणे म्हणजे फलंदाजांसाठी ‘मोकळे रान’ असते. फलंदाज या षटकात गोलंदाजांची चांगलीच धुलाई करू शकतात. पण यादरम्यान विरोधी संघ आपली विकेट नक्कीच घेऊ शकतो, ही गोष्ट फलंदाजांनी कधीच विसरता कामा नये. अशीच काहीशी चूक पाकिस्तानचा क्रिकेटपटू रोहेल नजीर (Rohail Nazir) याच्याकडून झाली. नजीर फ्री हिट असताना खेळपट्टीवर निवांत चालत होता, पण विरोधी संघाच्या खेळाडूंनी तो गाफील असताना त्याला धावबाद केले.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये सध्या राष्ट्रीय टी-20 चषक खेळला जात आहे. या स्पर्धेत नॉर्दर्न पाकिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा संघ आमने-सामने होते. रोहेल एका फ्री हिटवेळी स्ट्राईकवर होता. त्याने या षटकातील एका चेंडूवर हवेत उंच शॉट मारला. चेंडू हवेत उडाल्यानंतर थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. चेंडू झेलल्यानंतर त्या खेळाडूने हा चेंडू फेकला, जो थेट स्टंपवर लागला.
रोहेल नजीर याप्रसंगी गाफील असल्याचे दिसला आणि याचाच फायदा विरोधी संघाने योग्य वेळी उचलला. चेंडू थेट स्टंप्सपर जाऊन लागला आणि फलंदाजाला खेळपट्टी सोडावी लागली. मैदानातील पंचांना सुरुवातीला फलंदाज बाद असल्याची खात्री नव्हती, ज्यामुळे त्यांनी तिसऱ्या पंचांकडे धाव घेतली होती. नजीरला मैदानात असताना केलेले दुर्लक्ष महागात पडल्याचे दिसले. हा पूर्ण व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CiZ22Ogqekx/?utm_source=ig_web_copy_link
सामन्याचा विचार केला तर नॉर्दर्न संघाने 6 धावांनी पराभव स्वीकारला. रोहेल नजीर अशा पद्धतीने बाद झाल्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या मिम्स व्हायरल होत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
माजी कर्णधाराने नाकाराला क्रिकेट बोर्डाचा प्रस्ताव, जबरदस्तीने घ्यायला लावतायेत निवृत्ती
‘तुम्ही चीफ नाही, चीप आहात,’ पाकिस्तानी क्रिकेटरची निवड समितीवर कडाडून टीका
तब्बल 17 वर्षांनी टीम इंग्लंडने ठेवले पाकिस्तानात पाऊल; असे झाले स्वागत