बांगलादेश क्रिकेट बोर्डने बुधवारी टी-20 विश्वचषकासाठी निवडलेला संघ घोषित केला. विश्वचषकासाठी निवडलेल्या या संघात माजी कर्णधार महमूदुल्लाह याला संधी दिली गेली नाही. परंतु संघातून वगळल्यामुळे हा दिग्गज खेळाडू नाराज असल्याचे समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून महमुदुल्लाह (Mahmudullah) याला निरोपाचा सामना खेळण्यासाठी प्रस्ताव दिला होता, परंतु त्याने हा प्रस्ताव नाकारल्याचे समजते. माजी कर्णधाराला न्यूझीलंडमध्ये यजमान संघ आणि पाकिस्तानविरुद्धच्या तिरंगी मालिकेत शेवटचा सामना खेळण्याची संधी दिली जाणार होती, असे समोर येत आहे.
क्रिकेटच्या अनेक जाणकारांच्या मते महमुदुल्लाह (Mahmudullah) शक्यतो भविष्यात पुन्हा बांगलादेशसाठी खेळण्याची संधी मिळू शकणार नाही. त्याने बांगलादेशसाठी 121 टी-20 सामने खेळले आहेत आणि आशिया चषक 2022 मध्ये शेवटचा टी-20 सामना खेळला आहे. राष्ट्रीय संघाकडून त्याला शेवटचा सामना खेळण्यासाठी आग्रह केला गेला असला, तरी त्याने मात्र अद्याप हार मानली नाहीये. तो संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आही
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना याविषयी महत्वाची माहिती दिली. माध्यमांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगितले गेले आहे की, “महमुदुल्लाह सहमत नव्हता आणि तो निवृत्ती घेण्यासाठी तयार नसल्याचे त्याने सांगितले. त्याने जोर देऊन सांगितले की, तो अजून दोन वर्षी खेळणार आहे आणि राष्ट्रीय संघात स्वतःची जागा बनवण्यासाठी प्रयत्न करेल.”
दरम्यान कादी दिवसांपूर्वी बांगलादेशचे दोन दिग्गज तमीम इकबाल आणि मुशफिकूर रहीम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली होती. बीसीबी त्यांच्या या निर्णयामुळे खुश नाहीये आणि याच पार्श्वभूमीवर महमुदुल्लाह याच्यासाठी निरोपाचा सामना आयोजित करण्याचे ठरवले होते.
आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 साठी निवडलेला बांगलादेश संघ –
शाकिब अल हसन (कर्णधार), सब्बीर रहमान, मेहदी हसन मिराज, अफिफ हुसैन, मोसादेक हुसैन, लिटन दास, यासिर अली, नुरुल हसन, मुस्तफिजुर रहमान, सैफुद्दीन, तस्कीन अहमद, एबादत होसैन, हसन महमूद, नजमुल होसैन, नसुम अहमद.
राखीव खेळाडू –
शोरिफुल इस्लाम, रिषद होसैन, महेदी हसन, सौम्य सरकार.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
राजस्थान रॉयल्सने पाडला नवा पायंडा! या स्पर्धेत देणार 150 खेळाडूंना संधी
मी म्हणतोय ना, मग ‘तसेच’ झाले पाहिजे, विराटविषयी माजी दिग्गजाची खास प्रतिक्रिया
पंधरा वर्षांचा दुष्काळ संपवत भारत उंचावेल का टी20 विश्वचषक? महान कर्णधाराने वर्तवले भाकित






