मुंबई । सध्या चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्वावर बायोपिक म्हणजेच चरित्रपट बनविण्याचा ट्रेंड चालू आहे. अनेकांवर सिनेमे बनले आहेत. तर अनेकांच्या बायोपिकची योजना तयार केली जात आहे. अशामध्ये आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आपल्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चेत आला आहे.
नुकतेच एका मुलाखतीत त्याने केलेल्या विधानामुळे लोकांनी त्याची थट्टा उडवण्यास सुरुवात केली आहे. आपल्या विवादात्मक विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या आफ्रिदीने (Shahid Afridi) आपल्या बायोपिकबद्दल (Biopic) मत स्पष्ट केले आहे.
आफ्रिदी म्हणाला की, त्याला आपल्या आयुष्यावर आधारित चित्रपटात स्वत:च्या व्यक्तिरेखेत बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आमिर खान (Aamir Khan) किंवा मग टॉम क्रूज (Tom Cruise) यांना पहायला आवडेल. त्याने असे वक्तव्य करताच लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरु केले.
खरंतर एका मुलाखतीदरम्यान आफ्रिदीला प्रश्न विचारला की, जर त्याच्यावर आधारित चित्रपट झाला तर त्यामध्ये आफ्रिदी म्हणून कोणाला पहायला आवडेल? या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की, “जर बायोपिक इंग्रजीमध्ये झाला तर त्यामध्ये टॉम क्रूजला पहायला आवडेल. तसेच जर बायोपिक उर्दूमध्ये झाला तर त्यामध्ये माझ्या भूमिकेत आमिर खानला पहायला आवडेल.”
आफ्रिदीच्या बायोपिकबद्दल ऐकताच लोकांना हसू आवरले नाही आणि त्यांनी त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले.
एका चाहत्याने लिहिले की, “पाकिस्तानला २वेळा विकले तरीही आमिर खानची अर्धी फीदेखील देता येणार नाही.”
https://twitter.com/UntiringI/status/1261731050977243137
दुसऱ्या एका चाहत्याने आफ्रिदीला ट्रोल (Troll) करत यामध्ये आयुष्मान खुरानाच्या एक डायलॉगचा वापर केला.
Shahid Afridi : if a movie is made on me, I want "TOM CRUISE" to play my role
Tom Cruise: pic.twitter.com/8Gz1WaPo4E
— NILESH (@11scarsmusic) May 17, 2020
याव्यतिरिक्त आणखी एका चाहत्याने लिहिले की, “या बायोपिकचा पहिला सीन असेल की, आफ्रिदी फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे आणि पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. तसेच शेवटच्या सीनमध्येही आफ्रिदी फलंदाजी करताना उतरला आणि शून्यावर बाद झाला. याबरोबरच पुढे सिनेमा संपला…”
https://twitter.com/chakravarty_sid/status/1261760066295926785
चाहत्यांकडून आफ्रिदीला ट्रोल करण्यात येत आहे. परंतु आता आफ्रिदीच्या या विधानावर आमिर आणि टॉम काय उत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
ट्रेंडिंग घडामोडी-
-५ असे क्रिकेटर ज्यांचे संघातच होते मोठे दुश्मन, दोन जोड्या आहेत भारतीय
-टीमचा कोच म्हणतोय, तुझी आता टीममध्ये जागा नाही
-इंग्रजी बोलता न आलेल्या बाबर आझमने केला असा पलटवार