पाकिस्तानचा पूर्व क्रिकेटर कर्णधार व सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक याचा काल रविवारी लाहोर येथे कार अपघात झाला. या अपघातात शोएब मलिक फारसा दुखापतग्रस्त झाला नसून त्याच्या स्पोर्ट्स कारचे मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीएसएल ड्राफ्ट संपल्यानंतर आपल्या घरी परतत असताना मलिकची कार रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या मोठ्या ट्रकला जाऊन धडकली होती.
पाकिस्तानी न्यूज चॅनल समा टीव्हीच्या रिपोर्टनुसार शोएब मलिक व पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वाहाब रियाज यांच्यात कार रेस सुरू होती. या दरम्यानच दोघेही प्रचंड वेगाने कार चालवत होते व अशातच मलिक याचा कारवरील ताबा सुटला. कार 3 ते 4 गाड्यांना धडकत शेवटी मोठ्या ट्रक वर जाऊन आदळली.
मलिक जेव्हा पीएसएल ड्राफ्ट साठी पोहोचला होता तेव्हापासूनच त्याच्या स्पोर्ट्स कारची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. यावेळी वाहाब रियाज व अन्य खेळाडूंनी मलिकच्या कारची बराच वेळ पाहणी केली होती. ड्राफ्ट संपल्यानंतर घरी परतत असताना त्यांनी आपापसात रेस लावली व हा अपघात घडला.
अपघातानंतर वहाब रियाझने आपल्या कारने मलिकला लाहोर परफॉर्मेंस सेंटर येथे नेले. मलिकला फारशी दुखापत झाली नसली तरी तो, मोठ्या मानसिक धक्क्यात जाणवत होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आजच्या खेळीने पंतच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच आशियाई यष्टीरक्षक
शाबास गड्यांनो…! अश्विन आणि विहारी यांच्या जोडीने रचलाय ‘हा’ कमाल विक्रम
सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी पंतची धमाकेदार फलंदाजी, आजी-माजी क्रिकेटर्सनी थोपटली पाठ