पाकिस्तान क्रिकेट संघाचा फलंदाज उमर अकमलने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात त्याने आपल्या चुकीबद्दल पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांची आणि राष्ट्रीय मंडळाची माफी मागितली आहे. सन 2020 मध्ये त्याने सामना फिक्सिंग करण्याबाबत संपर्क साधण्यात आल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली नव्हती. त्यामुळेच उमरला 1 वर्षासाठी क्रिकेट मधून निलंबित केले होते .
उमर अकमलच्या त्याने केलेली ही मोठी चूक लक्षात आली आणि त्याने सर्वांची माफी मागितली आहे. त्याचबरोबर सामना फिक्सिंग प्रकरणामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवरही त्याचा परिणाम झाल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
उमर अकमल व्हिडिओमध्ये म्हणाला की, ’17 महिन्यापूर्वी म्हणजेच 2020 मध्ये माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली. त्यामुळे माझ्या क्रिकेट कारकिर्दीतला खूप मोठा फटका बसला. माझी ही चूक होती की, काही लोक सामना फिक्सिंग करण्यासाठी माझ्याकडे आले होते आणि त्यांनीच मला ही ऑफर दिली होती. परंतु, मी या घटनेची माहिती पीसीबीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली नसल्यामुळेच मला क्रिकेट मंडळाने 1 वर्षाची बंदी घातली होती. एक खेळाडू असून मला क्रिकेटपासून मैदानापासून दूर राहावे लागले. आणि या प्रसंगातून मी खूप काही शिकलो आहे.’
उमर यासंदर्भात पुढे म्हणाला की, ‘मी आज तुमच्या सर्वांसमोर सांगतो की माझ्या या चुकीमुळे स्थान क्रिकेटची खूप बदनामी झाली. या यामुळे मी माझ्या परिवार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि जगभरात जितके चाहते आहेत त्या सर्वांची माफी मागतो. त्याचबरोबर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की, कोणीही इतकी मोठी चूक कधी करू नका जर कोणती व्यक्ती तुम्हाला अशा पद्धतीचे कृत्य करण्यास भाग पाडत असेल तर त्याची माहिती तुम्ही लगेच पीसीबीला द्या. कारण त्यामुळे तुमची क्रिकेट कारकीर्द सुरक्षित राहील त्यावर कोणतेही प्रकारचे डाग लागणार नाहीत.’
https://twitter.com/DSBcricket/status/1412708675664420864
उमरेने त्याच्या कारकिर्दीत १६ कसोटीत १००३ धावा, १२१ वनडेत ३१९४ धावा आणि ८४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत १६९० धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जिद्द असावी तर अशी! पायातून रक्त वाहत असतानाही मेस्सीने संघाला मिळवून दिले अंतिम फेरीचे तिकीट






