---Advertisement---

तो परत आला! पाकिस्तानच्या पराभवानंतर ‘ओ भाई मारो मुझे’ म्हणणारा चाहता पुन्हा चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल

---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ शेवटच्या वेळी एकमेकांविरुद्ध खेळले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. पाकिस्तानचा एक चाहता या पराभवानंतर खूप भावूक झाला होता आणि त्याचा एक डायलॉग ‘ओ भाई मारो मुझे…मुझे मारो’ खूप लोकप्रिय झाला होता. आता हा चाहता पुन्हा परत आला आहे.

या सामन्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे चाहते त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. मोमीन साकिब नावाच्या या चाहत्यानेही सामन्याबद्दल आपल्या भावना सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या आहेत. मोमीन याने म्हटले की, भारत-पाकिस्तान सामना पुन्हा परत येत आहे. असे वाटत आहे की २०१९ च्या विश्वचषकातील सामना जणू नुकताच झाला आहे की काय. या सामन्यासाठी तुम्ही तयार आहात का? पाकिस्तान संघासाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे असेल.

सन २०१९ च्या विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर मोमीन साकिबचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

https://www.instagram.com/reel/CVF-AR4DzbG

टी २० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आत्तापर्यंत पाच वेळा समोरासमोर आले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. आजपर्यंत टी -२० मध्ये दोन्ही संघ आठ वेळा समोरासमोर आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने सात सामने आणि पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे.

दुसरीकडे, भारतीय संघाने सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लडला हरवले आहे. टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने ही एक सकारात्मक गोष्ट मानली जात आहे. पण भारतीय संघात सहाव्या गोलंदाजाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजी न करण्यामुळे संघात असमतोल वाढल्याचे बोलले जात आहे. अशात शार्दूल ठाकूरला खेळवण्या बाबत विचार केला जाऊ शकतो.

टी -२० विश्वचषकासाठी भारताचे वेळापत्रक
२४ ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, संध्या. ७.३०
३१ ऑक्टोबर – भारत वि. न्यूझीलंड, संध्या. ७.३०.
३ नोव्हेंबर – भारत वि. अफगाणिस्तान, संध्या. ७.३०.
५ नोव्हेंबर – भारत वि.स्कॉटलंड, संध्या. ७.३०
८ नोव्हेंबर – भारत वि. नामिबिया .संध्या.७.३०

महत्त्वाच्या बातम्या – 

एकट्या विराटची कामगिरी पाकिस्तानला घाम फोडण्यासाठी पुरेशी, पाहा ‘रनमशीन’ची जबरदस्त आकडेवारी

पाकिस्तानविरुद्ध रोहितची कामगिरी आहे चिंताजनक, टी२० क्रिकेटमध्ये १०० धावाही आल्या नाही करता

‘नेट गोलंदाज म्हणून निवड होणे ही प्रगती नाही तर अधोगती’, आवेश खानच्या वडिलांनी व्यक्त केली नाराजी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---