---Advertisement---

पाकिस्तानविरुद्ध रोहितची कामगिरी आहे चिंताजनक, टी२० क्रिकेटमध्ये १०० धावाही आल्या नाही करता

On: शुक्रवार, ऑक्टोबर 22, 2021 7:36 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू झाली आहे. पात्रता फेरीनंतर सुपर-१२ टप्प्यातील सामने शनिवार (२३ ऑक्टोबर) पासून खेळले जातील. सुपर-१२ मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तान सामना. भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा रविवारी (२४ ऑक्टोबर) दुबईत सामना करेल. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांच्या नजरा अनेक मजबूत खेळाडूंसह भारतीय संघाचा सलामीवीर आणि ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्मावर अधिक असतील.

रोहितने पाकिस्तानविरुद्ध एकूण ७ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात तो विशेष असा प्रभाव पाडू शकलेला नाही. या दरम्यान, रोहितला ६ सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने १७.५० च्या सरासरीने ७० धावा केल्या आहेत. मात्र, त्याचा स्ट्राइक रेट १२९.६२ इतका राहिला आहे. त्याने टी२० मध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद ३० धावांची आपली सर्वोच्च खेळी खेळली आहे. रोहितने पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना २००७ साली खेळला होता. याच सामन्यात त्याने आपली सर्वोच्च खेळी खेळली होती.

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित भारत-पाकिस्तान टी२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ६ सामन्यांत २५४ धावा करून अव्वल स्थान पटकावले आहे. २०१६ च्या विश्वचषकात रोहितने पाकिस्तानविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळला होता. या सामन्यात त्याने सलामीवीराची भूमिका बजावली होती. रोहितने या सामन्यात ११ चेंडूत फक्त १० धावा करून त्याची विकेट गमावली होती.

पाकिस्तानविरुद्ध रोहितने टी२० सामन्यांपेक्षा एकदिवसीय सामन्यात अधिक वर्चस्व गाजवले आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध १६ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ५१.४३ च्या सरासरीने आणि ८८.७८ च्या स्ट्राईक रेटने ७२० धावा केल्या आहेत. यात त्याने २ शतके आणि ६ अर्धशतके देखील केली आहेत. आपल्या खेळ्यांदरम्यान तो दोनदा नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

रोहितने पाकिस्तानविरुद्ध शेवटचा सामना २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळला होता. या सामन्यात त्याने ११३ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘नेट गोलंदाज म्हणून निवड होणे ही प्रगती नाही तर अधोगती’, आवेश खानच्या वडिलांनी व्यक्त केली नाराजी

ठरलं तर! भारत – इंग्लंड पाचव्या कसोटीला ‘या’ दिवशी होणार सुरुवात, इंग्लंड बोर्डाची घोषणा

‘रनमशीन’ विराट कोहलीपेक्षा ‘या’बाबतीत बाबर आजम खूपच दूर, पाहा ही खास आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---