भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम हे दोघेही दिग्गज फलंदाज आहेत. या दोन्ही फलंदाजांच्या नावे क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात मोठ-मोठ्या विक्रमाची नोंद आहे. या दोन्ही फलंदाजांमध्ये नेहमीच एकमेकांना मागे टाकण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत असते. आता हे दोन्ही फलंदाज आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत आमने-सामने येणार आहेत. परंतु, विराट कोहलीच्या नावे टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाची नोंद आहे, ज्यामध्ये बाबर आजम जवळपास पण नाहीये.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ९० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ५२.६५ च्या सरासरीने ३१६९ धावा केल्या आहेत. तो टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ हजार धावा पूर्ण करणारा एकमेव फलंदाज आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी न्यूझीलंड संघाचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टील आहे,ज्याने आतापर्यंत १०२ सामन्यात २९३९ धावा केल्या आहेत.
तसेच टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम हा १० व्या क्रमांकावर आहे. बाबर आजमने आतापर्यंत एकूण ६१ टी२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४६.८९ च्या सरासरीने २२०४ धावा केल्या आहेत. तो सरासरीच्या बाबतीत विराट कोहलीपेक्षा खूप मागे आहे. तर रोहित शर्माने १११ टी २० सामन्यात २८६४ धावा केल्या आहेत. (Virat Kohli is the Highest run scorer in T20 international cricket)
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१)३१५९ धावा – विराट कोहली*
२)२९३९ धावा – मार्टिन गप्टील
३) २८६४ धावा – रोहित शर्मा
४)२५३२ धावा – पॉल स्टरलिंग
५)२४७३ धावा – आरोन फिंच
६)२४२९ धावा – मोहम्मद हाफीज
७)२३६० धावा – ओएन मॉर्गन
८)२३३५ धावा – शोएब मलिक
९)२२६५ धावा – डेविड वॉर्नर
१०)२२०४ धावा – बाबर आजम
महत्त्वाच्या बातम्या –
भन्नाट कॅच! पीएनजीच्या चार्ल्स अमिनीने घेतला अविश्वसनीय झेल, फलंदाजी करणारा शाकीबही झाला थक्क
‘जे झालं त्याचा आम्ही विचार करत नाही, आता फक्त भारताला पराभूत करायचंय’, आझमची चेतावणी






