आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत रविवारी (२४ ऑक्टोबर) क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे. कारण भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. या सामन्यासाठी दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. त्यामुळे या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी चाहते वाटेल ते करायला तयार झाले आहेत. अशातच एका चाहत्याने पाकिस्तान संघातील वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीकडे तिकीटाची मागणी केली होती. त्यानंतर शाहीन आफ्रिदीने जी मजेशीर प्रतिक्रिया दिली, ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय.
एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहीन आफ्रिदी ट्रेनिंगसाठी जात असताना दिसून येत आहे. त्यावेळी तिथे उभा असलेला एक चाहता त्याला विचारतो की, “शाहीन भाऊ तुमच्याकडे भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट आहे का?” त्यानंतर शाहीन आफ्रिदीने जी प्रतिक्रीया दिली ती सध्या चाहत्यांच्या पसंतीची ठरतेय.
चाहत्याने तिकीटाची मागणी केल्यानंतर शाहीन आफ्रिदी आपले खिशात हात टाकतो आणि तिकीट शोधतोय असे दाखवतो. त्यानंतर तो चाहता त्याला पुन्हा म्हणतो की, “बघा ना खिशात असेल.” त्यानंतर शाहीन आफ्रिदी हसतो आणि पुढे निघून जातो.
फक्त शाहीन आफ्रिदी नव्हे तर यापूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माकडे देखील तिकीटाची मागणी करण्यात आली होती. तर झाले असे की, ८ ऑक्टोबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. हा सामना सुरू असताना, स्टेडियममध्ये एका प्रेक्षकाने फलकावर लिहिले होते की, “रोहित,भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी दोन तिकीट हवे आहेत.”
When a fan asked Shaheen “ India Pakistan match ki tickets han ap k pass” Shaheen checking his pocket ????
#T20WorldCup pic.twitter.com/jf9nLtRDdC— Asad Abdullah (@asad_qureshi257) October 19, 2021
भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये नेहमी हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. हे दोन्ही संघ शेवटच्या वेळी २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत आमने सामने आले होते. या सामन्यात देखील भारतीय संघाने विजय मिळवला होता. आयसीसी टी -२० आणि वनडे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाला एकही विजय मिळवण्यात यश आले नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘हे’ भारतीय करतील सर्वाधिक धावा अन् घेतील सर्वाधिक विकेट्स, ब्रेट लीची भविष्यवाणी
कसं काय पुणे? भारतीय क्रिकेटर विराट कोहली पुण्यात सुरू करतोय ‘रेस्टो-बार’






