आयपीएलच्या 12 व्या मोसमाला शनिवारी, 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलमध्ये नेहमीच अनेक विक्रम होतात आणि मोडलेही जातात. मात्र आयपीएलमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरने केलेला असा एक विक्रम आहे जो आत्तापर्यंत 11 वर्षात कोणालाही मोडता आलेला नाही.
तन्वीर आयपीएलच्या पहिल्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळला. या मोसमात 4 मे 2008 ला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्याने 4 षटकात 14 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्याची ही कामगिरी ही आयपीएल इतिहासातील आत्तापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन आहे.
2016मध्ये रायझिंग पुणे सुपरजायट्स संघाकडून खेळणारा ऍडम झम्पा तन्वीरच्या या विक्रमाच्या जवळपास पाहोचला होता. त्याने 10 मे 2016 ला सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध 4 षटकात 19 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या. पण तो धावांच्या तुलनेत तन्वीरच्या मागे पडला.
तन्वीरने आयपीएलचा 2008चा एकच मोसम खेळला असून या मोसमात त्याने चमकदार कामगिरी केली होती. तसेच राजस्थानला पहिले विजेतेपद जिंकून देण्यातही मोलाचा वाटा उचलला होता. त्याने 11 सामन्यात 22 विकेट्स घेतल्या होत्या.
मागील अनेक वर्षांपासून भारत – पाकिस्तान संबंध बिघडल्याने पाकिस्तानचे क्रिकेटपटू आयपीएलमध्ये सहभागी होत नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलमध्ये गेल्या ११ वर्षात सुरेश रैनाने जे केले ते यावर्षीही करणार का?






