टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विन यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) चे मालक इलॉन मस्क यांना खास विनंती केली आहे. त्यानं अफगाणिस्तान संघावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकारावर कारवाई करण्यास सांगितलं.
टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्ताननं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला. यासह अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत जिवंत असून ऑस्ट्रेलियासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. अफगाणिस्तानच्या या विजयानंतर एका पाकिस्तानी पत्रकारानं खळबळजनक दावा केला आहे. “अफगाणिस्तानचा संघ जगातील कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो, पण भारताला नाही. कारण आयपीएल करार खूप मोठा असतो”, असं या पत्रकारानं म्हटलं.
यावर अश्विननं त्याला सडेतोड उत्तर दिलं. अश्विननं ‘X’ वर लिहिलं, “तुम्ही (इलॉन मस्क) काय करायला हवं हे मी सांगू शकत नाही. पण माझ्या घरात कोण प्रवेश करेल हे ठरवण्याचा अधिकार मला असला पाहिजे. माझी टाइमलाइन, माझा निर्णय.” अश्विनचं हे ट्वीट चांगलच व्हायरल झालं आहे. तुम्ही हे ट्वीट येथे पाहू शकता.
I can’t tell u what to do @elonmusk but I should certainly have the right to decide who enters my house.
My timeline my decision🙏 https://t.co/WsR95ToHSk
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) June 23, 2024
ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, अफगाणिस्ताननं नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाचा संघ 19.2 षटकांत 127 धावांवर ऑलआऊट झाला. अशाप्रकारे अफगाणिस्ताननं 21 धावांनी शानदार विजय मिळवला.
टी20 विश्वचषक 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ साखळी फेरीतील 4 सामने आणि सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करून येथे पोहोचला होता. परंतु अफगाणिस्तान संघानं ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखला. हा सामना जिंकून अफगाणिस्ताननं उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा तर जिवंत ठेवल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार दुखावला, भारताला इशारा देत केलं मोठं वक्तव्य
अफगाण गोलंदाजांचा करिष्मा! ऑस्ट्रेलियाला हरवून असा रचला इतिहास; कांगारुंसाठी सेमीफायनलचं समीकरण बिघडलं
अफगाणिस्ताननं घेतला मागील पराभवाचा बदला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर