वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेपूर्वीच पाकिस्तानच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह स्पर्धेतून बाहेर पडणार असल्याचे वृत्तांमध्ये सांगितले जात आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेत नसीम शाह याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्याचे समजते. ही दुखापत खूपच गंभीर असल्याचे बोलले जात आहे. दुबईत झालेल्या नसीमच्या सुरुवातीच्या चाचणीवरून असे वाटत आहे की, तो या दुखापतीमुळे पुढील वर्षीपर्यंत कोणताही क्रिकेट सामना खेळू शकणार नाही.
नसीम शाह (Naseem Shah) याच्या दुसऱ्या चाचणीचे निकालही असेच आले, तर 20 वर्षीय खेळाडूला मैदानावर पुनरागमन करण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो. म्हणजेच तो या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कसोटी मालिकेसोबतच पाकिस्तान सुपर लीगच्या हंगामातही खेळताना दिसणार नाही.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1702993769778585630
कशी झाली दुखापत?
नसीमला ही दुखापत आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत सुपर- 4 फेरीत भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान झाली होती. तो 46व्या षटकादरम्यान मैदानातून बाहेर गेला होता. त्यानंतर लगेच त्याच्या स्पर्धेबाहेर होण्याची बातमी समोर आली होती. नसीमच्या उजव्या खांद्याखालच्या मांसपेशीला दुखापत झाली आहे.
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेसोबतच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही पाकिस्तानला नसीम शाह याची उणीव भासेल. मात्र, नसीमच्या अनुपस्थितीत शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांच्या खांद्यावर पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीची धुरा असेल.
विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) भारतात खेळला जाणार आहे. या स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडेल. तसेच, पाकिस्तान विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरुवात 6 ऑक्टोबरपासून नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याने करेल. या स्पर्धेत नसीमच्या अनुपस्थितीत पाकिस्तान कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (pakistani pacer naseem shah likely to miss world cup 2023 due to right shoulder injury)
हेही वाचा-
असे 4 खेळाडू, जे 2 देशांकडून खेळले World Cup, मॉर्गनच्या नावावर बाप Record
भारताच्या पराभवासाठी शुबमनने स्वत:ला दिला दोष; म्हणाला, ‘माझीच चूक होती, मी…’






