Sajid Khan injury : पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना रावळपिंडीत खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 344 धावा केल्या. यादरम्यान साजिद खानने 48 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान साजिद गंभीर जखमी झाला. साजिदला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. मात्र तरीही त्याने मैदान सोडले नाही.
खरे तर, साजिद पाकिस्तानसाठी दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यादरम्यान 92व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तो जखमी झाला. इंग्लंडकडून रेहान अहमद गोलंदाजी करत होता. त्याचा चेंडू साजिदच्या हेल्मेटमधून गेला आणि त्याच्या हनुवटीला लागला. त्यामुळे रक्तस्त्राव सुरू झाला. मात्र, तरीही त्याने मैदान सोडले नाही. साजिदची अवस्था पाहून फिजिओ मैदानात आले. त्यांनी प्राथमिक उपचार केले. साजिदने जर्सी बदलली आणि पुन्हा खेळायला सुरुवात केली.
पाकिस्तानसाठी साजिदची दमदार कामगिरी
साजिदने रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानकडून चमकदार कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने 6 विकेट घेतल्या होत्या. साजिदने 29.2 षटकात 128 धावा दिल्या. यानंतर साजिदने फलंदाजीतही कमाल दाखवली. त्याने 48 चेंडूंचा सामना करत 48 धावा केल्या. साजीतने 2 चौकार आणि 4 षटकार मारले. पाकिस्तानने पहिल्या डावात 344 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने दुसऱ्या डावात 3 गडी गमावून 24 धावा केल्या आहेत. यादरम्यान साजिदने 1 विकेट घेतली.
The Batter✅
The Bowler✅
The Warrior✅
The Fighter ✅Sajid Khan on Fire.!!🔥#SajidKhan #Pakistan #PAKvENG pic.twitter.com/zC24O2mQvB
— Z ۦ (@Strugglerr_2) October 25, 2024
शकीलने शतक झळकावले
पाकिस्तानकडून पहिल्या डावात साऊद शकीलने शतक झळकावले. त्याने 223 चेंडूंचा सामना करताना 134 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने 5 चौकार मारले. साजिद अलीने 48 धावांचे योगदान दिले. तर नोमान अलीने 45 धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर मालिका गमावू शकतो भारतीय संघ?
वयाच्या 23व्या वर्षी एका कॅलेंडर वर्षात 1000+ कसोटी धावा करणारे टाॅप-5 खेळाडू
काल सुंदर, आज मिचेल सँटनर; पुण्याचा मैदानावर किवी गोलंदाजाची कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी