झिम्बाब्वेच्या विरोधात मिळालेल्या पराभवामुळे बरेच खेळाडू भावनिक होताना दिसले. यामध्ये पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खान याचा एक न पाहिलेला व्हिडिओ समोर आलाय. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर शादाबचा भावनिक असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पाकिस्तानला या सामन्यात एका धावेने पराभव स्विकारावा लागला. झिम्बाब्वेविरुद्धच्या या पराभवाने पूर्ण पाकिस्तान संघावर भावनिक आघात झालाय, याचा प्रत्यय सामना संपल्यानंतर खेळाडूंच्या चेहऱ्यावरून येतो. यादरम्यानचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होतोय.
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) या स्पर्धेमध्ये गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे (Pakistan vs Zimbabwe) यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानला एका धावेने पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तानचे उपांत्य फेरीतील आव्हान देखील संपुष्टात येऊ शकतं. पाकिस्तानवर याआधी देखील भारताकडून 4 विकेट्सने पराभवाची नामुष्की ओढवली होती. आता झिम्बाब्वेनेही त्यांना एका धावेने हरवले. या पराभवानंतर पाकिस्तानी संघाचा उपकर्णधार शादाब खान (Shadab Khan) याचा एक न पाहिलेला व्हिडिओ समोर आला आहे.
काय आहे व्हिडिओत?
या व्हिडिओमध्ये शादाब ड्रेसिंग रूमच्या जवळ ओक्साबोक्शी रडताना दिसला. पाकिस्तानी चाहत्यांसाठी हा व्हिडिओ मन दुखावणारा आहे. शादाबने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन केले आणि 4 षटकात केवळ 23 धावा देत 3 गडी बाद केले. मात्र, तो फलंदाजीत फारसं काही करू शकला नाही. त्याने 14 चेंडूत 17 धावा केल्या.
https://twitter.com/xchaandbaliyan/status/1585928805079654400
https://twitter.com/faizacidic/status/1585921068413456384
आयसीसी टी20 विश्वचषक 2022च्या सुपर 12 फेरीतील 24व्या सामन्यात पाकिस्तान आणि झिम्बाब्वे एकमेकांना भिडले. झिम्बाब्वेने नाणेफेकीचा कौल जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्ये झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी 2 गडी गमावत 47 धावा केल्या. मात्र, नंतर धावगती संथ पडली आणि त्यांना 20 षटकांमध्ये 130 धावा बनवता आल्या. झिम्बाब्वेसाठी सीन विलियम्सने सर्वाधिक 31 धावा केल्या. झिम्बाब्वेने दिलेल्या 130 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाला 129 धावांपर्यंतच मजल मारता आली. यावेळी शान मसूदने 38 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. त्याची ही संयमी खेळी व्यर्थ झाली आणि पाकिस्तानला अवघ्या एका धावेने पराभव स्वीकारावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय यष्टीरक्षक कार्तिककडून मोठी चूक, प्रेक्षकांनी लावल्या ‘धोनी…धोनी’च्या घोषणा
नाद करा पण आमचा कुठं! जयवर्धनेचा विक्रम मोडण्यापासून विराट फक्त 27 धावा दूर, गेलला सोडलंय मागे